'या' अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती नोरा फतेही, ब्रेकअपनंतर दोन महिने होती डिप्रेशनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 06:00 AM2020-10-06T06:00:00+5:302020-10-06T06:00:00+5:30

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. काही वर्षापूर्वी अभिनेता अंगद बेदी आणि नोरा फतेहीचे झालेले ब्रेकअपनेही तुफान पब्लिसिटी मिळवली.

नोरा आणि अंगदने कधीच उघडपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर अचानक हे कपल चर्चेत आले होते.

दोघेही करिअरपेक्षा त्यांच्या खाजगी कारणांमुळेच ते सतत चर्चेत राहिले. दोघांच्या नात्यांवर वारंवार त्यांना प्रश्न केले गेले पण त्यांनी मौनच बाळगणे पसंत केले होते.

ब्रेकअपनंतर नोराने तिच्या नात्याविषयी कबुली देत अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते.

नोराने सांगितले होते की, अंगद त्यांच्या नात्याबाबत लॉयल नव्हता. मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केले होते. मात्र ब्रेकअपनंतर उद्धस्तच झाल्यासारखे मला वाटत होते.

ब्रेकअपनंतरचा काळ माझ्यासाठी सर्वात कठिण काळ होता .दोन महिने मी नैराश्यात गेले होते. मात्र या अनुभवाने मला ख-या अर्थाने घडवले असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही.

दुर्लक्षित झालेल्या करिअरकडे मी पुन्हा एकदा लक्षकेंद्रित केले.स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवीन सुरूवात केली.

मला पुन्हा एकदा जोमात काम करून स्वतःला सिद्ध करायचं होतं. जर ते ब्रेकअप झालं नसतं तर माझं कामासाठीचं पॅशन पुन्हा कधी परत आलं नसतं.

नोराने जन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात आयटम साँग केलं होतं. दिलबर- दिलबर या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली होती.

दिलबर- दिलबर या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली होती. या सिनेमानंतर नोराकडे अनेक गाण्यांच्या ऑफर यायला लागल्या.