SEE PICS : बेबी सोनिया ते नीतू सिंग कपूर...! इतक्या वर्षांत इतकी बदलली रणबीरची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 03:02 PM2021-07-08T15:02:22+5:302021-07-08T15:13:03+5:30

Happy Birthday Neetu Kapoor : 60 च्या दशकात बाल कलाकाराच्या रूपात अभिनयाची कारकिर्द सुरु करणा-या आणि पुढे हिंदी सिनेमातील एक प्रतिभावान अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणा-या नीतू सिंग यांचा आज वाढदिवस.

60 च्या दशकात बाल कलाकाराच्या रूपात अभिनयाची कारकिर्द सुरु करणा-या आणि पुढे हिंदी सिनेमातील एक प्रतिभावान अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणा-या नीतू सिंग यांचा आज (8 जुलै) वाढदिवस.

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि रॉकस्टार रणबीर कपूरची आई, अशीही नीतू सिंग यांची ओळख आहे.

8 जुलै 1958 रोजी नीतू सिंग यांचा जन्म झाला. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती.

फार कमी लोकांना ठाऊक असेल पण नीतू सिंग यांचे खरे नाव हरनीत कौर सिंह आहे. वयाच्या 8 व्या वर्षापासून त्यांनी सिनेमात काम करायला सुरूवात केली होती.बेबी सोनिया नावाने त्या ओळखल्या जात.

1972मध्ये ‘रिक्शावाला’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरूवात केली. पण ‘यादो की बारात’ या सिनेमाने त्यांना खरी ओळख दिली.

1975मध्ये नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा केला आणि एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

नीतू व ऋषी कपूर या लोकप्रिय जोडीने 11 सिनेमांत एकत्र काम केले. ख-या आयुष्यात पती-पत्नी म्हणून वावरताना नीतू यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ऋषी यांना सोबत केली.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर या जोडीचा पहिला सिनेमा ‘जहरीला इन्सान’ होता. पण हा चित्रपट दणकून आपटला होता.

नीतू अगदी 14 वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूरला डेट करण्यास सुरूवात केली होती. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर नीतूला सतत छेडत असायचे. त्यांची ही सवय नीतूला इरिटेट करत असे. मात्र हळू हळू हाच राग प्रेमात रुपांतरीत झाला. ‘खेल खेल में’ सिनेमानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या रोमान्सची चर्चा रंगली होती.

आपल्या लग्नात ऋषी कपूर आणि नीतू सिंग दोघेही बेशुद्ध पडले होते. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी. नीतू यांचा लेहंगा इतका जड होता की, तो त्या सांभाळू शकल्या नाहीत आणि त्या बेशुद्ध पडल्या. तर ऋषी कपूर हे आजुबाजूच्या गदीर्मुळे भोवळ येऊन खाली पडलेत. दोघेही शुद्धीवर आल्यानंतरच त्यांचे लग्न झाले होते.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचे अफेअर प्रचंड गाजले होते. लग्नापूर्वी ऋषी कपूर यांचे नाव अनेकींशी जोडले गेले होते. लग्नानंतरही स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या दिव्या भारतीशी त्यांचे नाव जोडले गेले. नीतू यांना ही गोष्ट कळली. पण त्या शांत राहिल्या.

नीतू एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल बोलल्या होत्या. ‘आम्ही एकमेकांशी डेट करत असतानाही ऋषी कपूर एका दुस-या अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करत होते. पण माझे अफेअर नाही, असे ते दाखवत..., ’ असे त्या म्हणाल्या होत्या. मी खूप साधी आणि निष्पाप होते. ऋषी यांच्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवायचे. मी सिंपल मुलगी आहे आणि मला सांभाळू शकते, असे त्यांनाही वाटायचे,’असेही नीतू या मुलाखतीत सांगितले होते.