Birthday Special : नवाझुद्दीन सिद्दीकीच्या या भूमिकांनी त्याला मिळवून दिले स्टारडम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:27 PM2020-05-19T15:27:41+5:302020-05-19T15:27:41+5:30

गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील अभिनयामुळे नवाझुद्दीन सिद्दीकीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.

सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे या त्याने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.

बजरंगी भाईजान या चित्रपटात त्याने पाकिस्तानमध्ये राहात असलेल्या एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.

रईस मध्ये पोलिस ऑफिसरची भूमिका साकारत नवाजने प्रेक्षकांचे मन जिंकले

मांझी या चित्रपटातील नवाजच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

रमन राघव 2.0 या चित्रपटात नवाजचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.

बदलापूर या चित्रपटातील नवाजच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले.

किक या चित्रपटात नवाज सलमान खानसोबत झळकला होता. या चित्रपटात देखील त्याचा अतिशय सुंदर अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला.