साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे नम्रता शिरोडकर, ड्रग्स प्रकरणात आलं नाव

By गीतांजली | Published: September 22, 2020 11:54 AM2020-09-22T11:54:36+5:302020-09-22T12:49:47+5:30

सुशांत केसमधील ड्रग्स अँगलमध्ये नम्रता शिरोडकरचे नाव समोर येणे धक्कादायक आहे. सुशांतची पूर्व मॅनेजर जया साहाच्या चौकशी दरम्यान एनसीबीला काही व्हॉट्सअॅप चॅट्स मिळाल्या ज्यात एका अभिनेत्रीचे नाव 'एन' ने सुरू होते. आजतकच्या रिपोर्टनुसार जया ज्या अभिनेत्रीशी चॅट करत होती ती दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री आणि साऊथच्या सुपरस्टारची पत्नी नम्रता शिरोडकर आहे. (Photo Instagram)

जयाच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ती एका अभिनेत्रीशी ड्रग्जबाबत बोलताना दिसत आहे. रिपोर्टनुसार ही अभिनेत्री जयाला ड्रग्जबद्दल सांगत होती की तू मला प्रॉमिस केले होतस की मला मुंबईत एक चांगला MD देशील आणि आपण एकत्र पार्टी करू. मग अभिनेत्री म्हणते मला एका ब्रेकची गरज आहे. (Photo Instagram)

यावर जया म्हणाली, तू मला पेडलर बनवत आहेस. तरीही तुझी ही इच्छा माझ्यासाठी आदेश आहे. (Photo Instagram)

१९९३ मध्ये नम्रताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला. यानंतर मॉडेलिंगची तिची कारकिर्द प्रचंड यशस्वी ठरी. यापश्चात नम्रताने मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. यात ती पाचव्या क्रमांकावर राहिली. मिस एशिया पॅसिफिक स्पर्धेतही ती पहिली रनरअप ठरली.(Photo Instagram)

फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलेल्या नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नाच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. (Photo Instagram)

यानंतर पुकार , वास्तव , हेराफेरी , अस्तित्व , कच्चे धागे , तेरा मेरा साथ रहे आणि एलओसी: कारगिल अशा अनेक हिट सिनेमांत नम्रता दिसली. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर नम्रता दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आणि याच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नम्रताला तिचा जोडीदार मिळाला महेश बाबू. (Photo Instagram)

नम्रता व महेशबाबूने २००५ लग्नाचा निर्णय घेतला. आता नम्रता व महेशबाबूला दोन मुले आहेत. मुलगा गौतम आणि मुलगी सितारा. (Photo Instagram)