Mind Your Language! मुंबई पोलिसांनी घेतला ‘दबंग’,‘कबीर सिंग’चा क्लास, कारणही खास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:30 PM2021-10-01T17:30:59+5:302021-10-01T17:39:26+5:30

Mumbai Police : सिनेमाचे हे डायलॉग कॉपी कराल तर खबरदार..! मुंबई पोलिसांच्या किएटीव्हीटीला सलाम!

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कायम मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. या हँडलवरच्या अनेक क्रिएटीव्ह पोस्ट क्षणात व्हायरल होता. आता मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया हँडलवर ‘प्रत्येक श्ब्द विचारपूर्वक वापरा,’ म्हणत काही बॉलिवूड चित्रपटांतील संवाद शेअर करण्यात आले आहेत.

महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवी बॉलिवूड चित्रपटांतील हे संवाद कधीही कॉपी करू नका, असा सल्ला मुंबई पोलिसांनी यानिमित्तानं दिला आहे. बॉलिवूड सिनेमातील काही महिलाविरोधी संवाद शेअर करत, मुंबई पोलिसांनी आपल्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडवलं आहे. प्रीती चुन्नी ठीक करो,या 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातील डायलॉगचं उत्तम उदाहरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

वो मेरी बंदी है... हा ‘कबीर सिंग’ याच सिनेमाचा संवादही मुंबई पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे.

जब लडकी को चेंज नहीं कर सकते, तो लडकी चेंज कर दो, हा ‘चश्मे बद्दूर’ चित्रपटातील संवादही मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.

हम तुम्हारे सनम या चित्रपटातील हा डायलॉग बघा. तुम एक पत्नी हो, तुम्हारा पति जैसे चाहेगा वैसे ही होगा... ये शादी के दस्तूर है. मर्द औरत का भगवान होता आहे..., हा एक संवाद मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.

पुष्पा हजार बार मैंने बोला है कपडे ढंग के पहना कर, तीन-तीन मर्द धूम रहे हैं यहां, हा ‘उजडा चमन’चा संवादही महिलाविरोधी ठरवत मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.

प्यार से दे रहे हैं, रख लो. वना थप्पड मारके भी दे सकते है, हा सलमानच्या ‘दबंग’ सिनेमाचा डायलॉगही मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.

‘मालामाल’ या सिनेमातील ‘अगर खूबसूरत लडकी को ना छेडो तो वो भी तो उसकी बेइज्जती होती है ना,’ हा संवादही शेअर केला आहे.

‘दिल धडकने दो’ या चित्रपटात राहुल बोसच्या तोंडचा ‘मैंने आएशा को बिजनस चलाने की परमिसन दी,’ असा संवादही मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.