Mothers day 2021 : संघर्षातून सिद्ध केले मातृत्व...! या आहेत बॉलिवूडच्या सिंगल मदर्स

Published: May 9, 2021 11:35 AM2021-05-09T11:35:34+5:302021-05-09T11:52:50+5:30

Mothers day 2021 :सिने जगतात स्वत:ला सिद्ध करणे एवढे सोपे काम नाही. त्यातच अभिनेत्रींना तर दुप्पट मेहनतीचा सामना करावा लागतो. शिवाय ती अभिनेत्री जर आई असेल तर तिला अभिनयाबरोबरच आईचेही कर्तव्य पार पाडून इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवावे लागते. बॉलिवूडमध्ये अशाच काही सिंगल मदर्स आहेत ज्यांनी संघर्षातून मातृत्व सिद्ध केले आहे.

अभिनेत्री नीना गुप्ता सुद्धा सिंगल मदर आहेत. नीना यांची मुलगी आज मसाबा गुप्ता प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. पण तिचा सांभाळ करताना नीना यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले़ नीना आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स एकमेकांच्या प्रेमात पडले होते, मात्र दोघांनी लग्न केले नाही. मसाबा नीना आणि विविनची मुलगी आहे. नीनाने एकटीने मसाबाचा सांभाळ केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह ही सुद्धा दोन मुलांची सिंगल मदत आहे. 1991 साली अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली. मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम. मात्र त्यांचं लग्न टिकलं नाही आणि लग्नाच्या 13 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अमृतांना दोन्ही मुलांचा सांभाळ केलाय.

सारिका ही पूर्वाश्रमीची अभिनेत्री. कमल हासनसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने एकटीनेच दोन मुलींचा सांभाळ केला.

सुश्मिता सेनने चाळीशी कधीच ओलांडलीये आणि ती सिंगल मदर आहे. सुश्मिताने अद्याप लग्न केलेले नाही. तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे़ सुश्मिता आपल्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करते.

मलायका अरोरा ही सुद्धा आताश: एक सिंगल मदर आहे़ अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर ती एकटी मुलाच्या जबाबदा-या पेलतेय.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही एकटीने दोन मुलांचा सांभाळ करते. २००3 साली बिझनेसमन संजय कपूर सोबत लग्न केले होते, लग्नानंतर तिने दोन मुलांना जन्म दिला. 2005 मध्ये तिची मुलगी समायरा जन्माला आली आणि 2010० मध्ये करिश्माने मुलगा कियानला जन्म दिला. मात्र 2016 मध्ये करिश्मा आणि तिचा पती संजयचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर करिश्मा एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय.

‘कसौटी जिंदगी की’ची कमोलिका अर्थात अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिने अगदी वयाच्या 16 व्या वर्षी लग्न केले होते. लग्नानंतर तिला जुळं मुलं झाली. मात्र मुलांच्या जन्मानंतर सहा महिन्यातच तिने नवºयाशी घटस्फोट घेतला आणि दोन मुलांचा एकटीने सांभाळ केला.

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीला पहिला पतीपासून एक मुलगी तर दुस-या पतीपासून एक मुलगा आहे. श्वेताची दोन लग्नं मोडलीत. सध्या ती एकटीच दोन मुलांचा सांभाळ करतेय.

बॉलिवूडमधील सिंगल मदरपैकी एक सलेली कोंकणा सेन ही नेहमीच तिच्या मातृत्वामुळे चर्चेत असते. कारण तिने आपल्या मुलाच्या पालनपोषणासाठी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. रणवीर शौरी याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर कोंकणाने आपल्या मुलाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आज ती सिंगल मदर म्हणून जगत असताना आईचे सर्व कर्तव्य पार पाडताना दिसत आहे.

एकता कपूर सरोगसीद्वारे आई बनली. आता ती एकटीच मुलाचा समर्थपणे सांभाळ करतेय.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीने 1994 मध्ये फरहान इब्राहिम फर्नीचरवाला सोबत लग्न केले़ लग्नानंतर दोघांना दोन मुलं झालीत. पूजा आणि इब्राहिमचा लग्नाच्या 9 वर्षांनंतर घटस्फोट झाला. 2003 मध्ये पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर पूजानं एकटीनंच दोन्ही मुलांना सांभाळले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!