जया बच्चन यांना का येतो इतका राग? एकदा राजेश खन्नावरही भडकल्या होत्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:33 PM2020-09-18T12:33:58+5:302020-09-18T12:49:24+5:30

राज ठाकरेंबाबत यूपीवरून केलेलं वक्तव्य असो वा अमर सिंह यांच्यावरील नाराजी किंवा रवि किशनवरील 'थाळी'चं वक्तव्य असो. जया बच्चन यांना जवळून ओळखणाऱ्यांना हे चांगलं माहीत आहे की, त्या अशाच आहेत. एकदा तर त्यांनी काका म्हणजेच राजेश खन्ना यांनाही दणका दिला होता.

फिल्म इंडस्ट्रीतील लोक किंवा सिनेमा पत्रकार असलेल्या लोकांना हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की, जया बच्चन यांना जरा जास्तच राग येतो. एकीकडे अमिताभ बच्चन हे विनम्रतेची प्रतिमूर्ती आहेत तर दुसरीकडे जया बच्चन या नेहमी मीडियापासून दूर राहतात आणि चालता-फिरता काही स्टेटमेंट देतात जे तिखट असतं.

मग ते राज ठाकरेंबाबत यूपीवरून केलेलं वक्तव्य असो वा अमर सिंह यांच्यावरील नाराजी किंवा रवि किशनवरील 'थाळी'चं वक्तव्य असो. जया बच्चन यांना जवळून ओळखणाऱ्यांना हे चांगलं माहीत आहे की, त्या अशाच आहेत. एकदा तर त्यांनी काका म्हणजेच राजेश खन्ना यांनाही दणका दिला होता.

ज्या प्रमाणे यश चोप्रा कॅम्प आणि करण जोहर कॅम्पने शाहरूख खानसोबतच्या सिनेमात अमिताभ बच्चन यांना घेऊन शाहरूखची उंची अशी वाढवली होती की, लोक शाहरूखला अमिताभ यांचा उत्तराधिकारी मानत होते. तसेच ऋषिकेश मुखर्जी यांनीही राजेश खन्नासोबत 'आनंद' सिनेमात छोटा पण शक्तिशाली रोल अमिताभला दिला होता.

त्यानंतर दोघांना आणखी दोन सिनेमात एकत्र काम दिलं होतं. एक होता 'बावर्ची' आणि दुसरा 'नमक हराम'. पण बावर्चीमध्ये अमिताभ यांना केवळ नरेटर म्हणून घेतलं होतं. म्हणजे अमिताभ यांचा केवळ आवाज. यात जया बच्चन राजेश खन्ना यांची हिरोईन होती. पण नमक हराममध्ये अमिताभ यांना काकाच्या बरोबरीचा रोल होता.

त्यामुळे काका थोडे चिडलेले होते. काकांना वाटत होतं की बावर्चीमध्ये अमिताभची गरजच नव्हती आणि नमक हराममध्ये अमिताभ यांना मोठा रोल देण्यात आला होता. त्यामुळे ते अमिताभ यांच्यासोबत जरा विचित्र वागू लागले होते. बावर्चीच्या सेटवर जया यांच्या हे लक्षात आलं होतं. सेटवर काका केवळ जयासोबत बोलत होते, अमिताभसोबत नाही.

एक दिवस जसे अमिताभ बच्चन सेटवर आले राजेश खन्ना यांनी काहीतरी कमेंट केली. जी अमिताभ यांनी ऐकली नाही. पण जया यांनी ऐकली होती. बॉलिवूडमध्ये चर्चा होती की, काकाने त्यावेळी अमिताभ यांना 'आ गया मनहूस' असं म्हटलं होतं. पण याची कुणीही पुष्टी केली नाही. पण जया यावरून भडकल्या. आणि रागात राजेश खन्ना यांना ऐकू जाईल असं बोलल्या की, 'बघा एक दिवस हा माणूस इतका मोठा स्टार होईल आणि जी व्यक्ती स्वत:ला देव समजते तिच्या काहीच राहणार नाही'. या किस्स्यानंतर दोघांचं नातं बिघडलं. पण अमिताभ बच्चन हे वर जात होते आणि काकांची चमक फिकी होत होती.

जया या मनात काही ठेवत नाहीत. त्यांना राग आल्यावर त्या बोलून टाकतात. अमर सिंह जया बच्चन यांच्यामुळेच बच्चन परिवारावर मरेपर्यंत रागात होते. पण जया काही मानल्या नाहीत. राज ठाकरे अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन असल्याने त्यांनी मुलाचं नाव अमित ठेवलं. पण जया यांनी त्यांनाही सोडलं नाही.

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत राज्यसभेत यावर भाष्य केलं. काही लोक बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत असा आरोप करत ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र करायचं हे चुकीचं आहे अस म्हणत फटकारलं होतं.

चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असं सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत. रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांनी केला.

तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या. त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.