16 वर्षाचा झाला माधुरी दीक्षितचा लहान मुलगा रियान, चेह-यावरील हावभाव बघून चाहते झाले CONFUSED

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 06:57 PM2021-03-09T18:57:49+5:302021-03-09T19:01:52+5:30

Madhuri Dixit wishes Son Ryan : बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच माधुरी दीक्षितचा छोटा मुलगा रियान 16 वर्षांचा झाला आहे. माधुरीने रियाचा एक फोटो शेअर केला आहे, शेअर केलेल्या फोटोमध्ये पती श्रीराम नेने आणि मुलासह माधुरी दिसत आहे.

माधुरीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये रियानचा चेहरा आनंदी दिसत नसून वैतागलेला दिसतोय. त्यामुळे माधुरीच्या चाहत्यांनी रियानला सल्ला द्यायला सुरुवात केली.

काहींनी हा इतका का नर्व्हस दिसतोय याविषयी प्रश्न विचारताना दिसतायेत. विशेष म्हणजे माधुरीच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस मार्चमध्येच येतो.

माधुरी दीक्षितने 17 ऑक्टोबर 1999 रोजी कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस मध्ये श्रीराम माधव नेनेशी लग्न केले. नेने हे देखील मराठी ब्राम्हण कुटुंबातील आहेत.

माधुरीने लग्नाच्या 4 वर्षानंतर 2003 मध्ये मोठा मुलगा आरिनला जन्म दिला. तिने आरिनच्या जन्मानंतर दोन वर्षांनंतर 2005 मध्ये रियान लहान मुलाला जन्म दिला.

माधुरीचा मोठा मुलगा आरिन लवकरच 18 वर्षांचा होईल. मार्चमध्येही आरिनचा जन्म झाला आहे. आरिन १७ वर्षांचा असून तो हुबेहुब वडील श्रीराम नेने यांची कार्बन कॉपी असल्याचे दिसते.

माधुरी आपल्या दोन्ही मुलांना आभ्यासाव्यतिरिक्त इतर कामातही व्यस्त ठेवते.लग्नानंतर माधुरी 10 वर्षे अमेरिकेत राहिली. त्यानंतर आपल्या कुटुंबासह २०११ मध्ये ती पुन्हा भारतात परतली आणि कायमची इथेच स्थायिक झाली.

त्यानंतर तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लग्नानंतर काहीशी दुरावलेली माधुरीने पुन्हा रसिकांचे मनोरंजन करायला सुरुवात केली.

कामातून वेळ मिळताच माधुरी फॅमिलीसोबत क्लॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसते.