माधुरी दिक्षितसोबत इंटिमेट सीन देताना या खलनायकाचा स्वतःवरचा सुटला होता ताबा, अशी झाली होती तिची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:06 PM2021-03-15T18:06:15+5:302021-03-15T18:17:43+5:30

माधुरी दिक्षितने एकाहून एक हिट चित्रपट देत बॉलिवूडवर राज्य केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एका चित्रपटाच्या सीनदरम्यान ती प्रचंड घाबरली होती.

माधुरीने तिच्या करियरच्या सुरुवातीला प्रेम प्रतिज्ञा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिची जोडी मिथुन चक्रवर्तीसोबत जमली होती.

या चित्रपटाच्या एका दृश्याच्यावेळी माधुरी प्रचंड घाबरली होती.

या चित्रपटात माधुरी आणि रंजीत यांच्यावर एक रेप सीन चित्रीत करण्यात आला होता.

या सीनचे चित्रीकरण करताना रंजीत या सीनमध्ये इतके समरस झाले होते की, त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला होता. त्यामुळे माधुरी प्रचंड घाबरली होती.

माधुरी इतकी घाबरली होती की, काहीही झाले तरी मी रंजीत यांना हात देखील लावून देणार नाही असे तिने ठरवले होते. त्यामुळे काय करायचे कोणालाच काही कळत नव्हते.