वयाची पन्नाशी उलटूनही 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचे लाल साडीतील फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 06:39 PM2021-06-07T18:39:32+5:302021-06-07T18:39:32+5:30

माधुरी दीक्षितने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत माधुरी दीक्षित लाल रंगाच्या साडीत छान पोझ देताना दिसते. माधुरी दीक्षितने ड्रेससोबत मॅचिंग ज्वेलरीदेखील कॅरी केले आहेत.

माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

माधुरी दीक्षितने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात १९८४ साली राजश्री प्रोडक्शन अबोध चित्रपटातून केली आहे.

त्यानंतर 1988 साली रिलीज झालेल्या तेजाब सिनेमातून ती लोकप्रिय झाली. त्यातील एक, दो, तीन.. हे गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे.

सध्या ती टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने ३ची परीक्षक आहे. या शोमधील ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते.

माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते.

माधुरी दोन मुलांची आई असली तरी ती आजही कोणत्याही तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते.