विना मेकअपसुद्धा दिसते ग्लॅमरस, पाहा हंसिका मोटवानीचा एअरपोर्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 12:54 PM2021-01-13T12:54:26+5:302021-01-13T12:59:30+5:30

वयाच्या 16व्या वर्षी रुपेरी पडद्यावर एन्ट्री करणा-या हंसिकाने मोजक्याच हिंदी सिनेमांत काम केले. परंतु ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री आहे.

हृतिकच्या 'कोइ मिल गया' सिनेमात हंसिका मोटवानी बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

अगदी गोंडस दिसणारी हंसिका आता ग्लॅमरस दिसू लागली आहे.

हंसिका आता ३० वर्षांची झाली असून तिने आत्तापर्यंत ५० सिनेमात काम केले आहे.

या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

हंसिकाचे फोटो नेहमीच सा-यांसाठी खास आकर्षण ठरत असतात.

काही दिवसांपासून हंसिका फारशी चर्चेत नव्हती .मात्र तिच्या मालदीव्हज व्हॅकेशन फोटोमुळे तिने पुन्हा सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

हंसिका नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली, तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

हंसिकाचं फारसं अस्तित्त्व बॉलिवूड सिनेमात जाणवत नसलं तरी दाक्षिणात्या सिनेमात मात्र ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

हंसिका मोटवानी आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालते.

ख-या आयुष्यात हंसिका विना मेकअपही खूपच सुंदर दिसत असून तिच्यावर चाहते फिदा होतात.

हंसिकाचा विनामेकअप लूक पाहून चाहते झाले फिदा.

तिची प्रत्येक स्टाइळ चाहत्यांसाठी खास असते.