अक्षय कुमारच नाही तर 'या' कलाकारांही साकारली आहे ट्रान्सजेंडरची भूमिका, कोण आहेत के कलाकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 07:03 PM2020-10-09T19:03:03+5:302020-10-09T19:13:57+5:30

बहुप्रतिक्षित 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात पहिल्यांदाच अक्षय कुमार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ट्रान्सजेंडरची भूमिका करत वाहवा मिळवली आहे. पाहुयात कोण आहेत ते कलाकार

सदाशिव अमरापूरकर यांनी संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या 'सडक' या चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.

परेश रावल यांनी 'तमन्ना' चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. त्यांच्याही भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लीव्हरने बर्‍याच चित्रपटांमध्ये ट्रान्सजेंडरच्या भूमिका साकारल्या आहेत. जॉनी लीव्हरने 'जीत' आणि 'हाऊसफुल 4' सारख्या चित्रपटात ट्रान्सजेंडर भूमिका केल्या आहेत.

कंगना राणौतचा मुख्य भूमिका असलेल्या ‘रज्जो’ चित्रपटात महेश मांजरेकर यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने बेगमची भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांनीही कौतुक केले होते.

कंगना राणौतच्या ‘रज्जो’ चित्रपटात महेश मांजरेकर यांनी ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. चित्रपटात त्याने बेगमची भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांनीही कौतुक केले होते.

या चित्रपटामध्ये प्रकाश राजने एक वेश्या व्यवसाय करणारी ट्रान्सजेंडर महाराणी नावाची भूमिका केली होती. तामिळ चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारा प्रकाश राज पहिला अभिनेता होता.

इमरान हाशमी स्टारर फिल्म 'मर्डर 2' मध्ये प्रशांत नारायणन यांनी धडकी भरवणा-या ट्रान्सजेंडर सायकोची भूमिका साकारली होती.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच तुफान पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. ट्रेलर पाहिल्यामंतर अक्षयच्या चाहते सिनेमा प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या हॉरर-कॉमेडीमध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे.