कियारा आडवाणीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, तिच्या नवीन फोटोंनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 11:34 AM2020-10-19T11:34:39+5:302020-10-19T11:45:18+5:30

कियारा आडवाणी 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिची जास्त चर्चा आहे. अक्षय कुमार आणि कियारा ही जोडी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी बिझी आहेत.

कियारा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते.

तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते.

तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

नुकताच लक्ष्मी बॉम्ब सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने स्टायलिश अंदाजात कियारा दिसली.

फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. ज्यात ती खूपच ब्युटीफूल आणि ग्लॅमरस दिसतेय.

फोटोतला हा लूक तिच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे.सोशल मीडियावर तिचे लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत.

तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. ला

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे.

या ग्लॅमरस फोटोसह तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तुर्तास या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.