पुल्कित सम्राट आणि कृति खरबंदा लॉकडाऊनमध्ये करतायेत रोमान्स, पाहा त्यांचा हटके रोमँटिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:20 PM2020-04-20T13:20:00+5:302020-04-20T13:20:02+5:30

पुल्कित सम्राट आणि कृति खरबंदा लॉकडाऊनमध्ये राहात असून ते सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट करत आहेत.

पुल्कित सम्राट आणि कृति खरबंदाच्या फॅन्सना त्यांचे हे फोटो प्रचंड आवडत असून याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

पुल्कित आणि कृति यांचे कपल त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. ते दोघे एकत्र खूपच क्यूट दिसत असल्याचे त्यांचे चाहते सांगतात.

कृती आणि तिचा प्रियकर पुल्कित सम्राट एकत्र राहात असल्याचे तिनेच एका मुलाखतीत सांगितले होते. तिने सांगितले होते की, मी आणि पुल्कित एकाच बिल्डिंगमध्ये राहात असून तो माझी काळजी घेत आहे.

कृतिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून त्यात पुल्कित कृतिच्या केसांना तेल लावताना दिसत आहे.

कृतीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आधी पुल्कितने माझ्या केसाला तेल लावले आणि त्यानंतर मी त्याच्या केसाला तेल लावून मसाज दिला.

पुल्कित सम्राटचे लग्न सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत झाले होते. पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्याने तिला घटस्फोट दिला. गेल्या काही महिन्यापासून तो कृतिसोबत नात्यात आहे.