अभय देओलच्या आयुष्यातील ‘ती’ कोण? जाणून घ्या कोण आहे शिलो शिव सुलेमान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:40 PM2021-09-28T14:40:25+5:302021-09-28T15:16:24+5:30

Abhay Deolने शिलो शिव सुलेमानसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे रोमॅन्टिक फोटो पाहून अभयच्या लाईफमध्ये शिलो शिव सुलेमान हिची एन्ट्री झाल्याचं मानलं जातेय.

अभय देओल तसा आपल्याच कोशात राहणारा अभिनेता. सोशल मीडियावर तो अगदी निवडक पोस्ट टाकतो. पण तूर्तास त्याने शेअर केलेले फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

होय, अभयने शिलो शिव सुलेमानसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे रोमॅन्टिक फोटो पाहून अभयच्या लाईफमध्ये शिलो शिव सुलेमान हिची एन्ट्री झाल्याचं मानलं जातेय.

आता ही शिलो शिव सुलेमान आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

तर ही शिलो हिचा अ‍ॅक्टिंगच्या दुनियेशी काहीही संबंध नाही. ती एक कन्टेम्पररी आर्टिस्ट आहे.

32 वर्षाच्या शिलो शिव सुलेमानला तिच्या इलस्ट्रेशन व इन्स्टॉलेशन आर्टसाठी ओळखले जाते. कर्नाटकच्या बेंगळुरू येथे जन्मलेली शिलो अतिशय बिनधास्त आयुष्य जगते.

तिची आई नीलोफर सुलेमान ही खूप प्रसिद्ध चित्रकार आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शिलो शिव सुलेमानही रंगांच्या दुनियेत रंगली.

वयाच्या 16 व्या वर्षी तिने पुस्तकाची इलेस्ट्रेशन बनवून कलेच्या दुनियेत एन्ट्री घेतली होती.

शिलो ही कला सामूहिक निर्भय सामूहिक संस्थापक आणि संचालक आहेत. या अंतर्गत 400 कलाकार काम करत आहेत जे लैंगिक हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी कलेचा वापर करतात.

शिलोला भटकंतीची प्रचंड आवड आहे. बिनधास्त जगणारी, बिनधास्त वागणारी, सोशल मुद्यांवर परखड मत मांडणा-या शिलोचे अभयशी काय नाते आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण चर्चा जोरात आहे.