टॉप नट्या या साईड बिझनेसमधून कमावतात बक्कळ पैसा, सनी लिओनी विकते हे खास प्रॉडक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 08:00 AM2021-01-09T08:00:00+5:302021-01-09T08:00:02+5:30

बॉलिवूडचे अनेक स्टार्स केवळ चित्रपटांवर अवलंबून नाहीत. तर अनेकांचे साईड बिझनेस आहेत. चित्रपटांसोबतच या साईड बिझनेसमधून हे स्टार्स बक्कळ कमाई करतात.

दीपिका पादुकोण एक महागडी अभिनेत्री आहे. शिवाय सोबत एक यशस्वी बिझनेस वुमनही. होय, काही वर्षांपूर्वी तिने ‘ऑल अबाऊट यू’ ही ऑनलाईन फॅशन लाइन लॉन्च केली होती.

अनुष्का शर्मा मोठी बिझनेस वुमन आहे. होय, तिचे स्वत:चे ‘क्लिन स्लेट’ नामक प्रॉडक्शन हाऊस आहे. याअंतर्गत तिने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. याशिवा ‘नुश’ नावाची तिची एक क्लोथिंग लाइनही आहे.

कतरिना कैफने नायकासोबत पार्टनरशिपमध्ये स्वत:चा ‘KAY’ हा ब्युटी ब्रँड लॉन्च केला आहे. तिचा हा ब्रँड तरूणींमध्ये खूप लोकप्रिय आहे.

सनी लिओनी सुद्धा बिझनेसच्या मामल्यात मागे नाही. सनी एकेकाळी अ‍ॅडल्ट स्टार होती. बिझनेससाठीही तिने अ‍ॅडल्ट स्टोर सुरु केले आहे. यात अ‍ॅडल्ट टॉईज, पार्टी विअर, स्वीम विअर सारखे प्रॉडक्ट विकल्या जातात. याशिवाय ती ‘लस्ट’ नामक एक परफ्यूम आणि कॉस्मेटिक लाइनही चालवते.

सुश्मिता सेन ही आता एक यशस्वी बिझनेसवुमन आहे. तिचे दुबईमध्ये ज्वेलरीचे रिटेल स्टोर आहे. तसेच हॉटेल्स सुरु करण्याचा तिचा विचार सुरु आहे.

अभिनेत्री लारा दत्ताने तिचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे. त्याद्वारे तिने ‘चलो दिल्ली’ या सिनेमाची निर्मिती केली होती. तसेच तिने साडी कलेक्शनही लॉन्च केले आहे.

शिल्पा शेट्टी ही आता सिनेमात दिसत नाही. पण ती पती राज कुंद्राच्या वेगवेगळ्या बिझनेसमध्ये सहभागी आहे. तिने स्वत:चे एक प्रॉडक्शन होऊसही सुरु केलेअसून त्याद्वारे एका सिनेमाची निर्मितीही तिने केली आहे. इतकेच नाही तर ती Iosis या स्पा आणि सलूनच्या चेनची सहमालकही आहे. त्यासोबतच तिने योगाची डिव्हीडी सुद्घा लॉन्च केली आहे.

ट्विंकल अनेक बिझनेस करते. तिने एक कॅन्डल आणि इंटेरिअर डिझायनिंगची कंपनी सुरु केली. तसेच ती पेपरमध्ये कॉलमही लिहिते. ट्विंकलने दोन पुस्तकेही लिहिले आहेत. सोबतचे तिने प्रॉडक्शन हाऊसही सुरु केले आहे. 'पॅडमॅन' हा या प्रॉडक्शन हाऊसची पहिला सिनेमा आहे.

पती संजय कपूरपासून वेगळी झाल्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूर ही स्वत:ची इ-कॉमर्स पोर्टल चालवते. या पोर्टलवरुन लहान मुलांचे कपडे आणि महिलांसाठीचे प्रॉडक्ट विकले जातात.