Katrina Kaif Birthday Special: katrina kaif pictures
Katrina Kaif Birthday Special : कतरिना कैफचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 06:00 AM2019-07-16T06:00:00+5:302019-07-16T06:00:05+5:30Join usJoin usNext कतरिना कैफचा आज म्हणजेच 16 जुलैला वाढदिवस असून तिचा जन्म हाँग काँगमधील आहे. कतरिना कैफने वयाच्या केवळ १४ व्या वर्षी मॉडलिंग करायला सुरुवात केली. कतरिना कैफने बुम या चित्रपटाद्वारे तिच्या बॉ़लिवूडमधील करियरला सुरुवात केली. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. कतरिनाचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला असला तरी मैंने प्यार क्यों किया या सलमान खानसोबतच्या चित्रपटामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मैंने प्यार क्यों किया या चित्रपटानंतर कतरिनाने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कतरिनाची गणना केली जाते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भारत या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. कतरिनाच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. तिचे सलमान खान आणि रणबीर कपूरसोबतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. कतरिना गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत असली तरी तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नाहीये. टॅग्स :कतरिना कैफKatrina Kaif