अंदाज अपना अपनाच्या सेटवरच्या करिश्मा कपूरने सांगितल्या या धक्कादायक गोष्टी, वाचून बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 12:59 PM2020-03-06T12:59:25+5:302020-03-06T13:25:41+5:30

अंदाज अपना अपना या चित्रपटाला २५ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये.

या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रवीना टंडन, करिश्मा कपूर, शक्ती कपूर, परेश रावल हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या बाबतीतला एक धक्कादायक खुलासा नुकताच करिश्मा कपूरने केला आहे.

या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटात शक्ती कपूरने साकारलेली मि.गोगो ही भूमिका तर चांगलीच गाजली होती.

अंदाज अपना अपना हा चित्रपट असंख्य वेळेस पाहिलेले अनेक लोक तुम्हाला भेटतील. पण तुम्हाला माहीत आहे का, करिश्मा कपूरने अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाहीये. तिनेच ही गोष्ट एका मुलाखतीत नुकतीच सांगितली आहे. त्याचसोबत या चित्रपटाच्या सेटवर कलाकारांमध्ये कसे नाते होते याविषयी देखील तिने सांगितले आहे.

सलमान खान आणि आमिर खान हे दोघेही आज बॉलिवूडमधील सुपरस्टार असले तरी या चित्रपटाच्यावेळेस या दोघांनाही तितकीशी लोकप्रियता नव्हती.

अंदाज अपना अपना या चित्रपटाची आज लोकप्रियता इतकी जास्त आहे की, या चित्रपटातील अनेक संवाद लोकांचे तोंडपाठ आहेत. पण या चित्रपटाला त्याकाळात बॉक्स ऑफिसवर तितकेसे यश मिळवता आले नव्हते.

अंदाज अपना अपना या चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रेक्षकांच्या भेटीस येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

अंदाज अपना अपना या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेस हे चौघेही एकमेकांशी बोलत नव्हते असा धक्कादायक खुलासा नुकताच करिश्माने राजीव मंसद यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

करिश्माने या मुलाखतीत सांगितले आहे की, आम्ही एकमेकांशी कोणीच बोलत नव्हतो हे चित्रपट पाहाताना कधीच प्रेक्षकांच्या लक्षात आले नाही इतकी आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली जमून आली होती.

रवीना आणि करिश्मा या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेस एकमेकांशी बोलत नसल्याची चर्चा आजवर अनेकवेळा रंगली होती. पण कोणतेच कलाकार एकमेकांशी बोलत नव्हते हे वाचून तर आता प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

अंदाज अपना अपना या चित्रपटाच्यावेळेस करिश्मा ही अतिशय फेमस अभिनेत्री होती. एकाचवेळेस ती तीन-चार चित्रपटांचे चित्रीकरण करायची. त्यामुळे तिला त्यावेळात हा चित्रपट पाहाण्यासाठी वेळच मिळाला नसल्याचे देखील तिने मुलाखतीत सांगितले.

करिश्मा कपूर आणि रवीना टंडन या दोघी अजय देवगणमुळे एकमेकांशी बोलत नसल्याच्या चर्चा त्याकाळात मीडियात रंगल्या होत्या.

अंदाज अपना अपना या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड गाजली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते.