Kanika Kapoor Wedding : बॉलिवूड सिंगर कनिका कपूर आज अडकणार लग्नबंधनात, पाहा ‘बेबी डॉल’च्या हळदीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:41 PM2022-05-20T12:41:41+5:302022-05-20T12:49:47+5:30

Kanika Kapoor Wedding : कनिका आज गौतम हाथीरमानीसोबत विवाहबद्ध होतेय. तिच्या मेहंदी सेरेमनीचे सुंदर फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

बेबी डॉल, चिट्टीयां कल्लाइयां, टुकूर टुकूर अशी गाणं गाणारी आणि या गाण्यांवर प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडणारी सिंगर कनिका कपूर हिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आज कनिका लग्नबंधनात अडकणार आहे.

कनिका कपूरदुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार, आज कनिका गौतम हाथीरमानीसोबत विवाहबद्ध होतेय. तिच्या मेहंदी सेरेमनीचे सुंदर फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मेहंदी सेरेमनीत कनिकाने ग्रीन कलरचा लहंगा घातला होता. तर गौतमने क्रिम कलरचा कुर्ता पायजामा घातला होता. याआधी दोघांचे हळदीचे फोटोही व्हायरल झालेहोते.

कनिका व गौतम वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी लंडनमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. कनिकाचा होणारा नवरा कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

तर गौतम एक एनआरआय बिझनेसमॅन आहे. तो दाना ग्रूप ऑफ कंपनीज्चा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. एका फ्रेन्डच्या माध्यमातून दोघांची पहिली भेट झाली होती.

कनिकाचं हे दुसरं लग्न आहे. कनिका 3 मुलांची (दोन मुली आणि एक मुलगा) आई आहे. 1997 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी तिचं पहिलं लग्न झालं होतं. उद्योगपती राज चंडोकशी तिचा विवाह झाला होता. 2012मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

कनिका कपूर उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये लहानाची मोठी झाली. कनिका लहानपणापासून गायिका व्हायचं होतं. पण वयाच्या केवळ 18 व्या वर्षी 1997 साली तिने एनआरआय बिझनेसमॅन राज चंडोकसोबत लग्न केलं. लग्नानंतर कनिका लंडनमध्ये शिफ्ट झाली.

लग्नानंतर कनिकाला तीन मुले झालीत. पण कालांतराने हे लग्न मोडलं. 2012 मध्ये कनिकाचा पतीसोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर कनिका मुंबईला परतली आणि तिने सिंगींग करिअर सुरु केलं.

कनिकाचं पहिलं गाणं जुगनी जी 2012 मध्ये रिलीज झालं. हे गाणं जबरदस्त लोकप्रिय झालं पण तिच्या करिअरला ‘बेबी डॉल’ या गाण्याने एका नव्या उंचीवर नेलं. या गाण्यामुळे कनिकाला बॉलिवूडची मोठी प्लेबॅक सिंगर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ती एका रात्रीत स्टार झाली.

‘रागिनी एमएमएस 2’चं बेबी डॉल हे गाणं सनी लिओनीवर चित्रीत करण्यात आलं आहे. हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं. या गाण्यासाठी कनिकाला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.