कोरोना व्हायरसवर मात दिल्यानंतर कनिका घालवतेय असा वेळ, पाहा तिचे हे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:22 PM2020-04-28T15:22:00+5:302020-04-28T15:25:01+5:30

काही दिवसांपूर्वी कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

कनिका आता पूर्णपणे बरी झाली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

कनिकाने सोशल मीडियावर तिच्या कुटुंबियांसोबतचा फोटो पोस्ट केला असून हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

कनिकाने या फोटोसोबत कॅप्शन लिहिली आहे की, तुम्हाला चांगले जीवन जगण्यासाठी केवळ एक गोड हास्य आणि एक कप चहाची गरज आहे.

कनिका अनेक दिवस लखनऊमधील रुग्णालयात दाखल होती. पण तिने या आजारावर मात केली असून ती घरी परतली आहे.

कनिकाने कोरोनाचा फैलाव केला असा आरोप तिच्यावर लावण्यात आला असून तिच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

परदेशातून आल्यानंतर कनिकाने क्वांरंटाईनमध्ये न राहाता काही पार्टींना हजेरी लावली होती.

करिनाचा कोरोनाचा रिपोर्ट अनेकवेळा पॉझिटिव्ह आल्याने तिच्या कुटुंबियांना चांगलेच टेन्शन आले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्याचनंतर तिला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.