IN PICS: 'धाकड'च्या रिलीज आधी तिरुपती बालाजीच्या चरणी नतमस्तक झाली कंगना राणौत, अभिनेत्रीने शेअर केलं फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 06:55 PM2022-05-17T18:55:18+5:302022-05-17T18:55:18+5:30

कंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे रोजी रिलीज होत आहे. चित्रपट हिट व्हावा यासाठी कंगना प्रमोशनसोबत देव दर्शनसुद्धा करत आहे. फोटो: इंस्टाग्राम)

कंगना राणौत 'धाकड'चे निर्माते दीपिक मुकुट आणि चित्रपटाच्या टीमसोबत दर्शन घेण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचली. (फोटो: इंस्टाग्राम)

तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनावेळी कंगना रणौत सुंदर साडीत दिसली. ट्रेडिशनल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कंगना रणौतने तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तिच्या लुकचे खूप कौतुक होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या कंगना राणौत दिल्लीपासून देशभरात या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. 'धाकड' हा चित्रपट 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

'धाकड'च्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आता प्रेक्षक हा चित्रपट रिलीज झाल्यावर त्याला किती प्रतिसाद हे पाहावं लागेल.

'धाकड' या चित्रपटात कंगना राणौतशिवाय अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)