In Pics: ‘पंगा गर्ल’ कंगना राणौतकडे आहे 100 कोटींची संपत्ती, जाणून घ्या वर्षाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 05:58 PM2020-09-10T17:58:45+5:302020-09-10T18:16:40+5:30

एका सिनेमासाठी घेते 10 ते 11 कोटी कोटी

बॉलिवूडमध्ये ‘पंगा गर्ल’ नावाने ओळखली जाणारी कंगना राणौत सध्या जाम चर्चेत आहे. या कंगनाकडे किती कोटींची संपत्ती आहे, तुम्हाला ठाऊक आहे?

आधी सुशांत प्रकरणावरून बॉलिवूडवर आरोप, नंतर मुंबईची पीओकेशी तुलना आणि आता ठाकरे सरकारशी पंगा अशा वेगवेगळ्या कारणांनी ती चर्चेत आलीय. मुंबईत 48 कोटींचे अलिशान कार्यालय असलेल्या कंगनाकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती आहे.

बॉलिवूडमध्ये कंगनाने तिच्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये अपार मेहनत केली आणि अभिनेत्रीच नाही तर निर्माता, दिग्दर्शक, लेखक म्हणूनही ओळख निर्माणा केली.

कंगना जवळपास 100 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

कंगनाची वार्षिक कमाई सुमारे 7.5 कोटी आहे.

चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून तिची बहुतांश कमाई होते.

कंगनाचा स्वत:ची एक क्लोदिंग लाइनही आहे. VERO MODA असे त्याचे नाव आहे.

कंगना एका सिनेमासाठी 11 कोटी रूपयांपर्यंत मानधन घेते.

जाहिरातीसाठी ती एक ते सव्वा कोटी रूपये वसूल करते.

मुंबईसह हिमाचलप्रदेशात कंगनाचा अलिशान बंगला आहे. मनालीतील या बंगल्याची किंमत सुमारे 20 कोटी आहे. इतकेच नाही तर तिच्याकडे सेंद्रिय शेतजमीनही आहे.

कंगनाला लक्झरी गाड्यांचा शौक आहे. तिच्याकडे एक बीएमडब्ल्यू 7 आणि एक मर्सिडीज बेंज जीएलई एसयूव्ही आहे.