FIR दाखल झाल्यावर कंगनाने शेअर केला बोल्ड फोटो, म्हणाली - 'मी त्यांची वाट बघत आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 01:36 PM2021-11-24T13:36:57+5:302021-11-24T13:48:11+5:30

Kangana Ranaut : कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या हातात वाइनचा ग्लास घेऊन दिसत आहे

मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यावर कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाची तुलना खलिस्थानी आंदोलनासोबत केली होती. ज्यानंतर देशातील वेगवेगळ्या भागात तिच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वीच शिख समुदायाविरोधात अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. आता बुधवारी कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर माहिती दिली की, तिच्या विरोधात आजही एक एफआयआर दाखल झाली आहे. पण याने कंगनाला जराही फरक पडत नाहीये.

कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या हातात वाइनचा ग्लास घेऊन दिसत आहे. यासोबत कंगनाने लिहिलं की, आणखी एक दिवस....आणखी एक एफआयआर.... ते जर मला अटक करायला आले तर...माझा घरी असा मूड आहे.

काय म्हणाली होती कंगना? - कंगना रणौतने शेतकरी मुद्द्यावरून आपल्या फेसबुक अकाऊंटवर एका वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. 'खलिस्तानी दहशतवाद आज भलेही सरकारचा हात पिरगाळत असेल, पण त्या महिलेला( इंदिरा गांधी) विसरून चालणार नाही, जिने आपल्या पायाखाली यांना चिरडलं होतं. त्यांना डासांप्रमाणे चिरडलं होतं. पण देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूच्या दशकानंतर आजही त्यांच्या नावाने यांचा थरकाप उडतो. त्यांना असेच गुरू हवे आहेत'.

एक दिवसाआधी कंगना विरोधात भोईवाडा पोलीस स्टेशन दादरमध्ये तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. शिखांविरोधात केलेल्या वादग्रस्त कमेंटसाठी दिल्ली शिख गुरूद्वारा प्रबंधक कमिटीने कंगना विरोधात देशद्रोह आणि अपमानजनक कमेंट केल्याप्रकऱणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

तीन कृषी कायदे मागे घेतल्याने सरकारच्या या निर्णयावर कंगना नाखूश आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं होतं की, 'दुख:द, पूर्णपणे चुकीचं..जर संसदेत बसलेल्या सरकारऐवजी गल्ल्यांमध्ये बसलेले लोक कायदे बनवत असतील, तर हाही एक जिहादी देश आहे...त्या सर्वांना शुभेच्छा ज्यांना हे असं हवं आहे'.

Read in English