'जयललिता' यांच्या लूकमध्ये अशी दिसणार कंगणा राणौत, तुमचीही हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:47 AM2020-10-12T11:47:57+5:302020-10-12T12:06:11+5:30

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून तिचा आगामी सिनेमा 'थलायवी'च्या सिनेमामुळे चर्चेत आहे.'थलायवी'च्या शूटिंगसेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यात हुबेहुब जयललिता यांच्या लूकप्रमाणेच तिचा लूक करण्यात आला आहे. पाहा जयललिता यांच्या रूपात अशी दिसणार कंगणा राणौत.

कंगनाचा हा सिनेमा तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याची स्क्रीप्ट बाहुबलीचे आणि मणिकर्णिकाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.

‘थलायवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी रुपये मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत. हा सिनेमा २६ जून २०२० रोजी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे शूटींग थांबवण्यात आलं होतं.

कंगना हुबेहूब 'जयललिता' यांच्यासारखी दिसत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांच्या अनेक कॉमेन्ट्स येत आहेत.

थलायवीसाठी तिचे वेगवेगळे लूक समोर पाहायला मिळतात.या सिनेमातील कंगणाचा अंदाजही अगदी निराळा असणार आहे.

कंगनाचा मेकअप, साडी नेसण्याची पद्धत, हेअर स्टाइल सारं काही हुबेहुब जयललिता यांच्यासारखं झालं आहे.