सामान्य मुलगी ते बॉलिवूडची क्वीन...! वयाच्या 15 व्या वर्षीच घरातून पळाली होती कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:08 PM2021-03-23T14:08:55+5:302021-03-23T14:17:51+5:30

आई-वडिलांशी भांडून तिने अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला आणि अथक संघर्षानंतर तिला यश मिळालं...

बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री कंगना राणौत हिचा आज वाढदिवस आहे.

23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याजवळच्या सूरजपूरमध्ये जन्मलेली कंगना तिच्या परखडपणासाठी ओळखली जाते.

कंगनाचे वडील अमरदीप राणौत एक बिझनेसमॅन आहेत आणि आई आशा शिक्षिका. कंगनाच्या जन्मावेळी दुसरी मुलगी झाली म्हणून तिची आईअनेक दिवस नाराज होती.

कंगना बालपणापासूनच काहीशी बिनधास्त स्वभावाची होती. छोट्या गावात राहूनही ती चित्रविचित्र कपडे घालायची. शॉर्ट पॅन्ट्स, व्हाईट शर्ट व हॅट घालून फिरायची. साहजिकच सगळे तिला विचित्र म्हणूनच ओळखायचे. अगदी तिच्या बहिणीलाही तिच्यासोबत चालताना विचित्र वाटायचे. खुद्द रंगोलीने एका मुलाखतीत हे सांगितले होते.

कंगनाने डॉक्टर व्हावे, अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती. पण वयाच्या 15 व्या वर्षी आईवडिलांच्या परवानगीशिवाय कंगना घरातून पळून दिल्लीला आली. प्रचंड संघर्ष केल्यानंतर अखेर तिला संधी मिळाली. पण त्याआधी बॅकस्टेज अ‍ॅक्टिंग, अँकरिंग असे सगळे तिने केले.

यानंतर पुन्हा एकदा आईवडिलांना न सांगता कंगना दिल्लीतून मुंबईत आली. यामुळे अनके वर्ष तिचे वडिल तिच्यासोबत बोलले नव्हते.

‘जेव्हा मी 15 किंवा 16 वर्षांचे होते, तेव्हा मी घर सोडून पळून गेले होते. तेव्हा मला वाटले की, मी आता जगाला माझ्या मुठीत ठेवेन. पण घर सोडल्यानंतर मी व्यसनाधीन झाले होते,’ असे कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते.

कंगनाने म्हणते, ‘घराबाहेर पडल्यानंतर दीड ते दोन वर्षात मी फिल्म स्टार आणि एक ड्रग व्यसनाधीनही होते. माझ्या आयुष्यात बरेच प्रॉब्लम सुरु होते. मी अशा लोकांच्या हातात अडकले होते, जिथून मला बाहेर पडता येत नव्हते,’ असा खुलासाही तिने या मुलाखतीत केला होता.

एका मुलाखतीत कंगनाने आदित्य पाचोलीवर मारहाणीचा आरोप केला होता. त्यावर आदित्य व त्याची पत्नी जरीना वहाबने कंगनावर अब्रूनुकसानीचा दावाही दाखल केला होता.

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला हवा देत असल्याचा आरोप कंगनाने प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्यावर केला होता. त्यावरून कंगनावर बरीच टीकाही झाली. मात्र, ती भूमिकेवर ठाम राहिली.