ये ना चॉलबो! कंगनाने शेअर केला बिकिनी फोटो, ट्रोलर्स म्हणाले - आपली संस्कृती विसरली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 01:08 PM2020-12-23T13:08:55+5:302020-12-23T13:21:46+5:30

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर कंगना 'थलायवी' सिनेमात दिसणार आहे. सोबतच ती तेजस या सिनेमात एका महिला पायलटची भूमिका साकारणार आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी कंगना रणौत सोशल मीडियात सतत अॅक्टिव असते. ती ट्विटरवर वादग्रस्त ट्विट करण्यासोबतच आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते.

कंगनाची फॅशन नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सद्या कंगनाचा कोरोना लूक चर्चेत आला आहे. तिचा हा बिकीनी फोटो व्हायरल झाला आहे.

कंगना रणौतने एक थ्रोबॅक फोटो शेअर केलाय. या फोटोत कंगना बिकीनीमध्ये दिसत आहे. ती बीचवर उन्हात बसून आनंद घेत आहे. या फोटोसोबत कंगनाने एक कॅप्शनही लिहिला आहे.

कंगनाने लिहिले की, मेक्सिको माझ्यासाठी एक्सायटींग ठिकाणी राहिलं आहे. जागा सुंदर आहे पण पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल. हा फोटो मेक्सिकोतील Tulum मधील आहे. कंगनाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

जी कंगना नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अशात तिचा हा अंदाज फॅन्सना इम्प्रेस करून गेला. तिचे फॅन्स तिचं कौतुक करत आहेत. सोबतच काही लोक तिला ट्रोलही करत आहेत.

अशात कंगनाच्या या बिकीनी फोटोवरही काही लोकांनी कमेंट केल्या आहेत. काही लोक म्हणाले आहेत की, कंगना आपली संस्कृती विसरली आहे. त्यांना असं वाटतं की, जी कंगना सतत देशाच्या संस्कृतीबाबत बोलत असते तिने बिकीनीतील फोटो शेअर करू नये.

दरम्यान सध्या कंगना शेतकरी आंदोलनाविरोधात बोलत असल्याने चर्चेत आहे. गायक दिलजीत आणि त्यांच्यातील ट्विटर वॉरही गाजला.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर कंगना 'थलायवी' सिनेमात दिसणार आहे. सोबतच ती तेजस या सिनेमात एका महिला पायलटची भूमिका साकारणार आहे.