कंगनाची चूक झाली, चित्रपटसृष्टीच्या निर्मात्यांचं नावही विसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:00 PM2020-09-15T20:00:50+5:302020-09-15T20:24:47+5:30

शिवसेना व कंगना राणौतचा वाद आता करण जोहरपर्यंत पोहोचला आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर बरसणारी कंगना आज अचानक पुन्हा एकदा करण जोहरवर बरसली.

बॉलिवूड इंडस्ट्री करण जोहर वा त्याच्या वडिलांनी साकारली नाही, असे कंगना म्हणाली. कंगनाच्या या कमेंटनंतर अभिनेता व निर्माता निखील द्विवेदीसोबत तिची जुंपली. या वादाची सुरुवात समाजवादी पार्टीचे डिजिटल मीडिया को-ऑर्डिनेटर मनीष जगन अग्रवालच्या एका ट्वीटने झाली.

कंगनाजी, तुम्ही सगळ्यांच्या संघर्षाला कमी लेखत, सर्वांवर टीका करत, सर्वांना लक्ष्य करत पुढे जाऊ पाहता का? करण जोहर असो वा अन्य चित्रपट निर्माता सर्व लोकांच्या एकत्रित अशा कष्टाने भारतीय चित्रपटसृष्टी उभी झाली आहे

कोणतीही इंडस्ट्रीत सर्वांना शिव्या देऊन 1-2 दिवसांत उभी होत नाही, असे ट्वीट मनीष अग्रवाल यांनी केले. मनीष अग्रवाल यांच्या या ट्वीटला उत्तर देत कंगनाने एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट केलेत

कंगनाने फिल्म इंडस्ट्रीची माहिती देताना, करण जोहरवर टीका केली. पण, फिल्म इंडस्ट्रीचे निर्माते दादासाहेब फाळके यांचे नाव लिहिताना कंगनाकडून चूक झाली आहे. कंगनाने दादासाहेब ऐवजी बाबासाहेब फाळके असे नाव लिहिले आहे.

बाबासाहेब फाळके यांच्यापासून ते प्रत्येक कलाकार, कामगार, सीमेरवरील सैन्य, संविधानाची रक्षा करणारे नेते आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाने, नागरिकाने ही सिनेइंडस्ट्री उभी केल्याचे कंगनाने म्हटले.

कंगनाच्या या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय देत तीची चूक तिला दाखवून दिली. मॅडम, बाबासाहेब नाही, दादासाहेब फाळके असे सांगून अनेकांनी कंगनाला ट्रोल केलंय.

कंगना सोशल मीडियावरुन बिनधास्तपणे आपली मुद्दे मांडत असते. सध्या तिने केलेले ट्विट चर्चेचा मुद्दा बनत आहेत. कंगना राणौतनं बॉलिवूड महानायक बिग बी यांची पत्नी खासदार जया बच्चन यांनाही लक्ष्य केलंय.

राज्यसभेत मंगळवारी जया बच्चन यांनी नाव न घेता कंगनावर निशाणा साधला होता. याबाबत कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ''जया जी, तुम्ही तेव्हाही असंच बोलला असतात का जर माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला टीएनेजमध्ये मारहाण झाली असती,

ड्रग्स दिलं गेले असतं आणि छेडछाड केली असती? तुम्ही त्यावेळीही हे बोलला असतात का जेव्हा अभिषेक बच्चनला त्रास दिला जात असता आणि एके दिवशी तो फासावर लटकलेला दिसला असता? आमच्याबद्दलही सहानुभूती दाखवा.'

कंगनाचे ट्विट हे कान्ट्रावर्सची विषय बनत आहेत, कंगना अनेकांना आपल्या ट्विटरवरुन थेट लक्ष्य करताना दिसून येत आहे. त्यामुळे, बॉलिवूडमधील कुणीही कंगनाच्या वादात पडताना दिसून येत नाही.

कंगना राणौतने शिवसेनेला लक्ष्य करणे अद्यापही बंद केले नाही, पण शिवसेनेने कंगनावार बोलण्याचे आता पूर्णपणे टाळले आहे.