विनामेकअप देखील काजोल दिसते तितकीच सुंदर... पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 04:16 PM2020-03-28T16:16:20+5:302020-03-28T16:22:52+5:30

कोरोनाने थैमान घातल्यामुळे सध्या काजोल घरीच असून तिच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे.

काजोल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून काही वेळा तिचे विनामेकअपचे फोटो देखील पोस्ट करत असते.

काजोलने एकाहून एक हिट चित्रपट दिले असून तिच्या अभिनयकौशल्याचे नेहमीच कौतुक केले जाते.

काजोल मेकअपशिवाय देखील खूप छान दिसते असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

काजोलचे लग्न अभिनेता अजय देवगणसोबत झाले असून त्यांना युग आणि न्यासा अशी दोन मुलं आहेत.

काजोलच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्या मुलांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

काजोल नुकतीच ‘तान्हाजी - द अनसंग हिरो’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

टॅग्स :काजोलKajol