एकेकाळी बॅकग्राउंड डान्सर होती काजल अग्रवाल, आता आहे करोडोंची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 02:32 PM2021-06-21T14:32:15+5:302021-06-21T14:32:15+5:30

अभिनय आणि ग्लॅमरस अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री काजल अग्रवालने नुकताच तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला. (फोटो इंस्टाग्राम)

काजल नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. तिने गौतम किचलूसोबत लग्न गाठ बांधली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काजल अग्रवालला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काजल अग्रवाल फिटनेससोबत लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

काजल वर्षभरात १४ कोटींची कमाई करते. सिनेमात करिअरची सुरूवात करण्यापूर्वी तिने जाहिरातीत काम केले आहे. तसेच तिने बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरूवात केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काजल अग्रवाल करोडोंची मालकीण आहे. तिच्याकडे बऱ्याच लक्झरी कार आहेत. यात बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, मिनी कूपर आणि ऑडी या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काजल अग्रवालकडे एक नाही तर दोन आलिशान घर आहे. एक मुंबईत आहे तर दुसरे हैदराबादमध्ये आहे. ती जवळपास ६६ कोटींची मालकीण आहे.(फोटो इंस्टाग्राम)