PICS : आता कसा दिसतो ‘कभी खुशी कभी गम’मधील तो चिमुकला? फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 07:37 PM2021-05-03T19:37:37+5:302021-05-03T19:47:01+5:30

‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान आहे. या सिनेमातील चिमुकला बालकलाकार आठवतो?

‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान आहे. या सिनेमातील चिमुकला बालकलाकार आठवतो?

शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन आणि करिना कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमातील या चिमुकल्याचे खरे नाव आहे जिब्रान खान.

जिब्रानने सिनेमात काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारली होती. शाहरुख आणि काजोल एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न करतात आणि यूकेमध्ये स्थायिक होतात. त्यांना एक मुलगा आहे. त्या मुलाच्या भूमिकेत जिब्रान खान दिसला होता. हा चिमुकला इतक्या वर्षानंतर कसा दिसतो तर अगदीच हँडसम.

जिब्रान हा अभिनेता फिरोज खानचा मुलगा आहे. फिरोज खान यांनी महाभारत या मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारली होती.

कभी खुशी कभी गम याशिवाय वे रिश्ते आणि क्योंकि मैं झूठ नहीं बोलता या चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून काम केले आहे.

होय, जिब्रानचे आत्ताचे फोटो बघाल तर थक्क व्हाल. निरागस मुलाची भूमिका साकारणा-या जिब्रान खानची पर्सनालिटी जबरदस्त आहे.

जिब्रान खान सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवर त्याला 1 लाख 40 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

जिब्रान अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

रणबीर कपूर, आलिया भटसोबत तो ‘ब्रह्मास्त्र’साठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे़