कभी खुशी कभी गम या चित्रपटात मालविका राजने साकारली होती ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:22 PM2019-04-01T19:22:27+5:302019-04-01T19:31:33+5:30

मालविका राज हे नाव वाचकांसाठी नक्कीच नवीन नाहीये. मालविका ही प्रसिद्ध बालकलाकार आहे.

मालविका राजने कभी खुशी कभी गम या प्रसिद्ध चित्रपटात करिना कपूरच्या बालपणाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

मालविका राज गेल्या काही वर्षांपासून तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असल्याने बॉलिवूडच्या लाइमलाईटपासून दूर होती.

मालविका राज स्क्वॉड या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात डॅनी डेंझोपाच्या मुलासोबत तिची जोडी जमणार आहे.

मालविका राजचा स्क्वॉड हा अॅक्शन चित्रपट असून ती या चित्रपटावर सध्या चांगलीच मेहनत घेत आहे.