जुही चावलाच्या शेतात आंब्यांचा ढीग, पाहा अभिनेत्रीचं मँगो फार्म हाऊस

Published: May 7, 2021 07:31 PM2021-05-07T19:31:08+5:302021-05-07T19:37:58+5:30

बॉलिवूडची चुलबुली गर्ल म्हणजेच जुही चावला. बॉलिवूडपासून लांब असली तरी हटके काम करत आहे. गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही चावला काही वर्षांपासून सेंद्रीय शेती करत आहे. याशिवाय सेंद्रीय उत्पादन वापराला जुही प्रोत्साहन देत असते.

जुही चावला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने तिच्या शेतातले काही खास फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.

जुहीने शेअर केलेल्या फोटोत चक्क तिच्या समोर आंब्यांचा ढिग लागल्याचे पाहायला मिळतंय.

आंब्यासोबतचा हा फोटो शेअर करत तिने खास कॅप्शनही दिली आहे.

ज्यांच्या कडे शेती नाही अशा शेतक-यांना जुहीने तिची शेती करण्यासाठी दिले आहे.

इतक्या ग्लॅमरस अभिनेत्रीला अशा प्रकारे शेतात काम करताना अभावानेच पाहायला मिळतं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पण हे खर आहे पालघरमधील वाडा इथल्या फार्म हाऊस परिसरातील भागात जुही सेंद्रीय शेती करते.

जुहीचे वडील शेतकरी होते. त्यांनीच या भागात २० एकर जमीन खरेदी केली. मात्र अभिनयात व्यस्त असल्याने जुहीला शेतीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता.

वडिलांच्या निधनानंतर जुहीने सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला.

एकदा सेंद्रीय पदार्थ खाण्याची आवड निर्माण झाली की केमिकलयुक्त पदार्थ तुम्ही विसराल असं जुहीला वाटतं.

त्यामुळे सेंद्रीय शेतीसारखं हटके काम करत जुहीने अनोखा आदर्श निर्माण केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मधील एक भाग पाहून जुहीला सेंद्रीय शेती करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे तिने सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!