म्हणून म्हाताऱ्याशी लग्न केले, जय मेहतासोबत जूही चावलाचे लग्न झाल्यानंतर उडवली गेली होती खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:45 PM2021-03-25T18:45:49+5:302021-03-25T19:08:08+5:30

Juhi Chawla And Jay Mehta love story: जुही चावला जेवढी गॉर्जियस दिसते तेवढेच तिचे पती तिच्या पेक्षा वृद्ध वाटतात. आजही जुही पूर्वी इतकीच सुंदर दिसते. आजही चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा होतात. मात्र जुही जेव्हा पती जय मेहतासोबत एकत्र पाहायला मिळते तेव्हा मात्र दोघांची जोडी सुट होत नसल्याच्याच चर्चा रंगतात.

1997 मध्ये जुही चावलाने बिझनेसमन जय मेहतासोबतलग्न केले. जुही जय यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना दोन मुलंही आहेत.

जुहीने जेव्हा जय मेहतासोबत लग्न केले तेव्हा जय मेहता ३३ वर्षाचे होते आणि जुही २८ वर्षांची होती.

जय मेहता लकूमध्ये वयाने मोठे दिसतात. त्यामुळे जुहीने म्हाता-यासोबत लग्न केल्याची खिल्ली उडवली गेली होती.

जय मेहता हे बिझनेसमन आहेत. देशातच नाही तर इतर देशांमध्येही त्यांचे बिझनेस आहेत.

जय मेहता श्रीमंत असल्यामुळेच जुहीने त्यांच्यासह लग्न केल्याची तिच्यावर टीका केली गेली होती.

मुळात जुहीने जय मेहतासोबत लग्न केले तेव्हा ही गोष्टी मीडियापासून लपवून ठेवली होती.

लग्नानंतर अभिनेत्रींची लोकप्रियका कमी होते असा समज त्यावेळी होती, करियर चालू ठेवायचे होते.

म्हणून लग्न झाल्याचे लवपून ठेवल्याचे खुद्द जुहीनेच सांगितले होते.

त्यावेळी मीडियाचा इतका गाजावाज नव्हता त्यामुळे लग्नाची बातमी लपवणे तिला शक्य गेले.

जुहीच्या लग्नाची पोलखोल जेव्हा झाली तेव्हा ती पहिल्यांदा प्रेग्नेंट झाली, तेव्हा तिने सा-यांसमोर लग्न केल्याचे कबूल केले होते.