BTS PHOTOS : जानूचा थाटचं न्यारा..., जान्हवी कपूरच्या दिमतीला इंडस्ट्रीतील बेस्ट टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:17 PM2022-05-17T14:17:15+5:302022-05-17T14:21:27+5:30

Janhvi Kapoor : होय, बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरने काही बीटीएस फोटो शेअर केले आहेत. यात तिने तिच्या टीमची झलक दाखवली आहे.

बॉलिवूड स्टार्सचा थाटचं न्यारा असतो. यांच्या दिमतीला सतत डझनभर माणसं तैनात असतात. सिनेमाच्या शूटींगचं सोडा, पण साधं फोटोशूट असलं तरी अनेक लोकांची टीम काम करते आणि तेव्हा कुठे स्टार्सला परफेक्ट लुक मिळतो. विश्वास बसत नसेल तर हे फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.

होय, बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरने काही बीटीएस फोटो शेअर केले आहेत. यात तिने तिच्या टीमची झलक दाखवली आहे.

जान्हवी कपूरच्या स्टायलिश व ग्लॅमरस लुकमागे तिच्या टीमची मेहनत असते. ही टीम कशा पद्धतीने काम करते, हे या फोटोत पाहायला मिळतंय.

फोटोत काही जण तिचं मेकअप करत आहेत, काही तिच्या केसांची स्टाईल करत आहेत. काही तिचा ड्रेस अ‍ॅडजस्ट करत आहेत. जान्हवी एकदम परफेक्ट दिसावी, यासाठी सगळी टीम काम करतेय.

जान्हवीने टीमचे फोटो शेअर करत, आर्मीची झलक दाखवली आहे. ही माझी टीम आहे आणि माझ्याकडे सर्वात बेस्ट टीम आहे, अशा आशयाचं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

जान्हवी या बीटीएस फोटोत एकदम स्टनिंग दिसतेय. टीम तिच्या दिमतीला हजर आहे आणि टीम बेस्ट म्हटल्यावर जान्हवी एकदम टेन्शन फ्री आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर जान्हवीकडे सध्या वेगवेगळे प्रोजेक्ट आहे. गुड लक जेरी, मिली, मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही अशा अनेक चित्रपटांत ती झळकणार आहे.