बाप लेकीची शेवटची भेट राहिली अधूरी, ऋषी कपूर यांचे लेकीसोबतचे खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 04:20 PM2020-04-30T16:20:48+5:302020-04-30T16:33:50+5:30

ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते.

लॉकडाउन असल्यामुळे रिधिमा तिच्या सासरी दिल्लीत अडकली होती. याच कारणामुळे या बाप-लेकीची अखेरची भेटही झाली नाही.

चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेले ऋषी कपूर एक प्रेमळ पिताही होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळतात.

ऋषी कपूर यांचंही त्यांच्या लेकीवर रिधिमा कपूर साहनीवर जीवापाड प्रेम होतं.

या फोटोमध्ये बाप-लेकीचे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल.

ऋषी कूपर या फोटोत मुलगी रिद्धीमा आणि नातीसह खेळत निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे.

प्रत्यक्षात मात्र अखेरच्या दिवसांमध्ये या बाप-लेकीची भेट होऊ शकली नाही.

न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना रिद्धीमासह संपूर्ण कुटुंबच ऋषी कपूर यांच्यासोबत होते.

ऋषी कूपर या फोटोत मुलगी रिद्धीमा आणि नातीसह खेळत निवांत आणि सुखी क्षणांचा आनंद घेत असल्याचं यांत दिसत आहे.