इरफान खानचा मुलगा बाबील बॉलिवूडमध्ये करणार धमाकेदार एन्ट्री, प्रतीक्षा फक्त मे महिन्याची...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:11 PM2021-01-11T14:11:20+5:302021-01-11T14:18:53+5:30

इरफानचा मोठा मुलगा बाबिल हा लंडन युनिव्हर्सिटीत शिकतो आणि हुबेहुब आपल्या बाबासारखा दिसतो.

अभिनेता इरफान खान आज आपल्यात नाही. पण त्याच्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतील. तूर्तास इरफानचा मुलगा बाबील याच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात आहेत.

इरफानचा मोठा मुलगा बाबिल हा लंडन युनिव्हर्सिटीत शिकतो आणि हुबेहुब आपल्या बाबासारखा दिसतो.

नुकतेच बाबीलने त्याच्या सोशल मीडियावर ‘अ‍ॅक्टर्स ऑन अ‍ॅक्टिंग’ या अ‍ॅक्टिंगशी संबंधित एका पुस्तकाचा फोटो शेअर केला. यानंतर लोकांनी बाबीलवर त्याच्या बॉलिवूड डेब्यूविषयी प्रश्नांची सरबत्ती केली.

या प्रश्नांना उत्तर देताना, बाबील बॉलिवूड एन्ट्रीबद्दल बोलला. मी आधीपासूनच अ‍ॅक्टिंग फिल्डमध्ये आहे. फक्त मी सिनेमात कधी दिसणार, हा प्रश्न आहे. येत्या मे महिन्यात मला ग्रॅज्यएट होऊ देत, यानंतर मी ऑफर्सबद्दल विचार करेन, असे त्याने स्पष्ट केले.

बॉलिवूडमध्ये येणार म्हणजे, अ‍ॅक्टिंग करणार की कॅमे-याच्या मागे राहून दिग्दर्शन करणार, हे मात्र बाबीलने स्पष्ट केलेले नाही.

बाबीलला पडद्यावर पाहण्यास इरफानचे चाहते उत्सुक आहेत. अशात साहजिकच चाहत्यांना मे महिन्याची प्रतीक्षा असेन.

बाबील सोशल मीडियावर बराच अ‍ॅक्टिव्ह आहे. पित्याच्या निधनानंतर तो कायम त्याच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

1995 मध्ये इरफान व सुतापा यांचे लव्ह मॅरेज झाले होते. इरफान व सुतापाला आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव अयान.

अयान सध्या शिकतोय. ‘लाइफ ऑफ पाई’ या सिनेमात अयान आपल्या वडिलांसोबत म्हणजेच इरफानसोबत झळकला होता.