सुशांत सिंग राजपूतच्या अकाउंटला इंस्टाग्रामने सांगितले अविस्मरणीय, चाहते झाले इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 06:00 PM2020-06-19T18:00:31+5:302020-06-19T18:04:33+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ते सोशल मीडियावर त्याचे फोटो व व्हिडिओ शेअऱ करुन आठवणींना उजाळा देत आहे.यादरम्यान इंस्टाग्रामने त्याच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवरील नावाच्या पुढे रिमेम्बरिंग म्हणजे अविस्मरणीय लिहिले आहे.

सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाच्या वृत्तामुळे त्याचे सहकलाकार व चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सुशांतचे फोटो व व्हिडिओजच्या माध्यमातून चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. यादरम्यान इंस्टाग्रामने त्याच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवरील नावाच्या पुढे रिमेम्बरिंग म्हणजे अविस्मरणीय लिहिले आहे.

खरेतर इंस्टाग्रामवर लोकप्रिय व्यक्तीच्या निधनानंतर त्याचे अकाउंट अविस्मरणीय अकाउंट केले जाते आणि त्या व्यक्तीच्या नावापुढे रिमेम्बरिंग असे लिहिले जाते. हे पाहून सुशांतचे चाहते खूप इमोशनल झाले आहेत. त्यांना सुशांत या जगात नाही, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही.

सुशांत सिंग राजपूत खऱ्या आयुष्यातही रिअल हिरोपेक्षा कमी नव्हता. त्याचे सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यावर हे लक्षात येते.

विशेष करून सोशल मीडियावर बॉलिवूडच्या कलाकारांच्या फॉलोव्हर्सची संख्या लाखोंमध्ये असते आणि हे कलाकार फार मोजक्या लोकांना फॉलो करत असतात. मात्र सुशांतचे असे नव्हते.

सुशांतने इंस्टाग्रामवर जवळपास सात हजार लोकांना फॉलो केले होते. चाहत्यांचे प्रश्न असो किंवा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तरी सुशांत नेहमी त्यांच्या इच्छा पूर्ण करत होता.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या घरातले व जवळच्या मित्रमंडळींसोबत चौकशी केली आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची देखील चौकशी झाली आहे. जवळपास नऊ तास चाललेल्या चौकशीत पोलिसांनी रियाला महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले.

पोलीस स्टेशन बाहेर पडल्यानंतर मीडियाने रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने हात जोडून सर्वांना नकार दिला आणि गाडीत बसून निघून गेली.