PICS : या अलिशान रिसॉर्टमध्ये वरूण-नताशा बांधणार लग्नगाठ, एका रात्रीसाठी मोजावे लागतात 4 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 11:27 AM2021-01-22T11:27:32+5:302021-01-22T11:35:18+5:30

वरूण धवन व नताशा दलाल यांच्या लग्नाची लगबग सुरु झालीये.

वरूण धवन व नताशा दलाल यांच्या लग्नाची लगबग सुरु झालीये. होय, अलिबागेत वरूण व नताशा लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नासाठी अलीबागेतील एक शानदार रिसॉर्ट फायनल करण्यात आले आहे.

द मेन्शन हाऊस या ठिकाणी नताशा व वरूणचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. तूर्तास द मेन्शन हाऊसमध्ये या सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे.

वरूण व नताशाआपल्या कुटुंबासोबत आजच याठिकाणी मुक्कामाला पोहोचणार आहेत.

वरूण व नताशाचा लग्नसोहळा अतिशय खासगी असणार आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यासाठी रिसॉर्टच्या बाहेरचा संपूर्ण परिसर मोठमोठ्या पडद्यांनी झाकण्यात येत आहे.

ज्याठिकाणी वरूण व नताशाचे लग्न होणार आहे, ते मेन्शन हाऊस सुमारे १ एकर जागेत पसरले आहे. या अलिशान रिसॉर्टमध्ये 25 खोल्या, स्विमींग पुल, सीक्रेट गार्डन, रेस्टारंट,स्पा, पूल साईड कबाना अशा सगळ्या सुविधा आहेत.

हे संपूर्ण मेन्शन हाऊस एक रात्रीसाठी बुक करण्यासाठी 4 लाख रूपये मोजावे लागतात.

23 जानेवारीला वरूण व नताशाची हळद व मेहंदी सेरेमनी आहे. यानंतर 24 जानेवारीला हिंदू पद्धतीने दोघेही विवाहबद्ध होणार आहेत.

लग्नात अगदी मोजके पाहुणे असतील. यानंतर मुंबईत एक ग्रॅण्ड रिसेप्शन देण्यात येईल. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी होतील.

आधी वरूण व नताशाने व्हिएतनाममध्ये लग्नगाठ बांधणार होते. मात्र कोव्हिड महामारीमुळे हा प्लान रद्द करावा लागला होता.

वरूण धवन व नताशा बालपणाचे मित्र आहेत. शाळेतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Read in English