एकदा पाहाच...! राजकुमारच्या घराचे हे Inside Photos पाहून म्हणाल, अतिसुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:00 AM2021-04-03T08:00:00+5:302021-04-03T08:00:02+5:30

गुडगावमध्ये जन्मलेला आणि 16 लोकांच्या संयुक्त कुटुंबात राहणा-या राजकुमार रावला (Rajkummar Rao) मुंबई या स्वप्ननगरीत एक हक्काचे घर हवे होते. अखेर त्याची ही इच्छा पुर्ण झाली.

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता राजकुमार रावने नुकतेच मुंबईत एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केले. त्याच्या या नव्या घराचे फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. (Rajkummar Rao lavish home)

गुडगावमध्ये जन्मलेला आणि 16 लोकांच्या संयुक्त कुटुंबात राहणा-या राजकुमारला मुंबई या स्वप्ननगरीत एक हक्काचे घर हवे होते. अखेर त्याची ही इच्छा पुर्ण झाली.

म्हणायला हे घर दुमली अपार्टमेंट आहे, पण याच्या आतील नजारा महालापेक्षा कमी नाही.

एका पेन्ट ब्रँडने राजकुमारच्या घरातील आतील नजारा शूट केला आहे. आता त्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

राजकुमारला फार झगमगाट आवडत नाही. त्याची ही आवड लक्षात घेऊन त्याचे हे घर सजवण्यात आले आहे.

घरात आल्यावर शांती आणि आनंद झाला पाहिजे. त्यानुसार, प्रत्येक कोपरा न कोपरा सजवण्यात आला आहे.

लिव्हिंग रूममध्ये बसून वाचन करणे, कॉफी पिणे आणि बाल्कनीतून समोरचा नजरा न्याहाळत बसायला त्याला आवडते.

राजकुमारच्या घरातील फर्निचर, आर्ट वर्क अगदी छोट्या छोट्या वस्तू युनिक आहेत.

राजकुमारचे हे स्वप्नातले घर पूर्ण व्हायला सुमारे दोन वर्षे लागलीत. प्रत्येक गोष्ट त्याने त्याच्या आवडीने खरेदी केलीे. कलर, टेक्सचर, घरातील शोभेची प्रत्येक वस्तू त्याने स्वत: स्टोर्समध्ये जाऊन निवडली.

अवार्ड, पुरस्कारासाठी राजकुमारने घरातील एक खास कोपरा राखीव ठेवला आहे.

राजकुमारच्या घराचा वरचा फ्लोर मिटींग व पार्टीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या वरच्या माळ्यावर जाण्यासाठीचा सुंदर जीना पाहण्यासारखा आहे.