शिल्पा शेट्टीने सुरू केले आलिशान रेस्टॉरंट, फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 07:07 PM2020-12-05T19:07:38+5:302020-12-05T19:07:38+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

शिल्पा शेट्टीने फोटो शेअर करत लिहिले आहे की हे तयार आहे.

खरेतर शिल्पाने मुंबईतील वांद्रे येथील बॅस्टियन चेनचे एक रेस्टॉरंट वरळीत सुरू केले आहे.

या विशेष दिवशी तिने जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुखला निमंत्रण दिले होते.

शिल्पा या फ्रेंचाइजीची को-ओनर आहे. शिल्पा, तिचा नवरा राज कुंद्रा आणि जेनेलियाने वरळीतील बैस्टियन रेस्टॉरंटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिल्पा शेट्टी फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे.

जेनेलियाने सेल्फी शेअर करत लिहिले की, शिल्पा आणि राज बैस्टियनमधील सुंदर संध्याकाळसाठी थँक्यू. सर्व काही खूप चांगले होते.