Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 06:00 AM2022-08-15T06:00:00+5:302022-08-15T06:00:00+5:30

Independence Day 2022: यंदा भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने पाहा हे दहा देशभक्तीवर आधारीत चित्रपट

विकी कौशलचा उरी चित्रपट २०१६ ला रिलीज झाला. हा चित्रपट उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्च पॅडवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे.

केसरी चित्रपट सारागडीच्या लढाईवर आधारित आहे. ही लढाई म्हणजे जगभरातील मानवी शौर्याची सर्वात प्रेरणादायी कथा मानली जाते. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता.

सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत भारत हा चित्रपट साऊथ कोरियन ड्रामा असलेल्या ओडे टू माय फादरया चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे.

आलिया भटचा राझी चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. यात आलियासोबत विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहे.

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली होती.

शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट ‘चक दे ​​इंडिया’ हॉकीवर आधारित आहे.

अक्षय कुमारचा हा आणखी एक चित्रपट जो आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करतो. हा चित्रपट लंडनमधील 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या पहिल्या सुवर्णपदक जिंकण्याच्या सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या एक काल्पनिक कथेवर आधारित आहे.

बेबी हा चित्रपट नीरज पांडे दिग्दर्शित अ‍ॅक्शन-थ्रिलर आहे.

लक्ष्य चित्रपट देखील देशप्रेमाने भरलेला आहे.

स्वातंत्र्य दिनाचा सुट्टीला हॉलिडे हा चित्रपट आवर्जून पाहा.