22 वर्षांची भळभळती जखम...! 12 वर्षांची असल्यापासून इलियाना डिक्रुज झेलतेय हे दु:ख!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:35 PM2021-04-27T18:35:09+5:302021-04-27T18:50:48+5:30

मी 12 वर्षांची असल्यापासून लोकांनी विचित्र कमेंट दिल्या. अशा कमेंटमुळे मला लाज वाटायची, असे इलियाना म्हणाली.

बॉलिवूडमधील बरेच सेलेब्रिटी ब-याचदा ट्रोल होतात. बॉडी शेमिंगचे शिकार होतात. अभिनेत्री इलियाना डिक्रुज त्यापैकी एक आहे. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान इलियाना डिक्रुज बॉडी शेमिंग आणि ट्रोलिंगबाबत उघडपणे बोलली. (Ileana dcruz open ups on body shaming)

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत इलियाना यावर बोलली. मी 12 वर्षांची होते, तेव्हापासून बॉडी शेमिंगची शिकार ठरतेय. आजही ती घटना आठवली की, मनात कालवाकालव होते, असे इलियाना म्हणाली.

मी तारूण्यात पदार्पण केलच होते की लोकांनी माझ्या बॉडी पार्टबद्दल नको ते बोलणे सुरू केले होते. ओह माय गॉड, तुझ्या शरीराचा हा भाग किती मोठा आहे, असे काय काय लोक तोंडावर बोलायचे. हे काय सांगू इच्छितात, हे मला तेव्हा कळायचे नाही, असे तिने सांगितले.

तारूण्यात पदार्पण करत असताना तुमच्या शरीरात अनेक बदल होतात. मात्र हे माहित असूनही लोक विवित्र कमेंट्स करतात. हळूहळू लोक जे बोलतात, तेच तुम्हाला खरे वाटू लागते, असे ती म्हणाली.

बॉडी शेमिंग तुमच्या मनावर न भरणारा घाव सोडून जातो. लोकांच्या गोष्टी सहन करायला खूप मोठी हिंमत लागते. आजही मला लोकांच्या म्हणण्याचे काहीही फरक पडत नाही,असे रोज स्वत:ला समजावत असते, असेही तिने सांगितले.

आज मी एक सेलिब्रिटी आहे. पण आजही मला इन्स्टाग्रामवर दिवसाला 10 मॅसेज येतात. या मॅसेजमधून लोक माझ्या बॉडी पार्ट्सची खिल्ली उडवत असतात, त्यावर विनोद करत असतात, असा खुलासाही तिने केला.

मी लोकांना थांबवू शकत नाहीत. मी फक्त माझ्यात हे सहन करण्याची हिंमत आणू शकते. हे माझे शरीर आहे आणि या शरीरासोबतच मला आयुष्य घालवायचे आहे. माझे माझ्या शरीरावर प्रेम आहे, हे मी रोज स्वत:ला समजावते आणि पुढे जाते, असेही ती म्हणाली.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच इलियाना ‘अनफेअर अ‍ॅण्ड लव्हली’ या सिनेमात दिसणार आहे. यात ती रणदीप हुड्डासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Read in English