भाईजानचा टॉवेल ते माधुरीचा लेहंगा..., लिलावात लाखो रूपयांत विकल्या गेल्या या वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 03:19 PM2021-12-26T15:19:17+5:302021-12-26T15:25:57+5:30

Bollywood : आपल्या आवडत्या स्टार्सच्या वस्तू मिळवण्यासाठी क्रेझी फॅन्स लाखो रूपये मोजायला तयार असतात. विश्वास बसत नसेल तर हे वाचा...

‘लगान’या चित्रपटात आमिर खानने वापरलेली क्रिकेट बॅट. खरी तर ही साधीसुधी बॅट. पण आमिर त्या बॅटने खेळला म्हटल्यावर तिची किंमत कशी मोजणार? या बॅटचा लिलाव झाला तेव्हा, ती 1 लाख 56 हजाराला विकली गेली.

‘ओह माय गॉड’ या चित्रपटातील एका सीनमध्ये अक्षय कुमारने एक सुंदर सूट घातला होता. तो लिलावात 15 लाख रूपयांत विकला गेला.

‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील ‘जीने के है चार दिन’ या गाण्यात सलमानने टॉवेलसोबत डान्स केला होता. त्याचा हा टॉवेल एका ऑनलाइन पोर्टलने लिलावात काढला आणि त्याला 1 लाख 42 हजार रूपये किंमत मिळाली.

शाहरुख खानने त्याच्या डूडल पेंटिंगचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचे चाहते ते विकत घेण्यासाठी वेडे झाले. हे डूडल पेंटिंग 2 लाख रुपयांना विकले गेले, ज्यामध्ये आयफेल टॉवर, कॉनकॉर्ड, व्होल्टेअर इत्यादी विविध फ्रेंच घटक बनवले गेले.

‘देवदास’ चित्रपटातील ‘मार डाला’ या गाण्यात एक सुंदर हिरव्या रंगाचा लहंगा परिधान केला होता. हा लहंगा लिलावात काढला तेव्हा तो 3 कोटी रुपयांना विकला गेला होता.

फराह खानच्या एका चॅट शोमध्ये प्रियंका चोप्राची स्वाक्षरी असलेल्या एका ड्रेसचा लीलाव झाला होता. यावेळी प्रियंकाच्या एका चाहत्याने हा ड्रेस 50 हजार मोजून आपला केला होता.

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर आज आपल्यात नाही. पण चाहत्यांच्या मनात ते आजही जिवंत आहे. ‘जंगली’ चित्रपटात त्यांनी घातलेल्या एका जॅकेटचा लिलाव झाला तेव्हा त्याकाळात ते 88 हजाराला विकले गेले होते.

‘उमराव जान’ या आयकॉनिक चित्रपटात फारूख शेख यांच्या बोटातील हिरव्या खड्याची एक अंगठी 96 हजारांत विकली गेली होती.