IN PICS : मलायका व अर्जुन जगतात लक्झरी लाईफ, आहे इतक्या कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 03:50 PM2022-06-26T15:50:03+5:302022-06-26T15:59:58+5:30

Arjun Kapoor Malaika Arora : मलायका अरोरा व अर्जुन कपूर हे बॉलिवूडचं हॉट कपल. दीर्घकाळापासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या नात्यात अनेक चढऊतार आलेत. पण आजही दोघं सोबत आहेत.

मलायका अरोरा व अर्जुन कपूर हे बॉलिवूडचं हॉट कपल. दीर्घकाळापासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या नात्यात अनेक चढऊतार आलेत. पण आजही दोघं सोबत आहेत.

आज अर्जुनचा वाढदिवस. सध्या अर्जुन व मलायका दोघंही पॅरिसमध्ये आहेत आणि या प्रेमाच्या शहरात अर्जुनचा वाढदिवस साजरा होतोय. अर्जुन व मलायका दोघंही लक्झरी आयुष्य जगतात.

दोघांकडेही कोट्यवधी रूपयांची संपत्ती आहे. मध्यंतरी दोघांच्या संपत्तीची तुलना झाल्यामुळे अर्जुन कपूर संतापला होता. मलायका अर्जुनपेक्षा जास्त कमावते, तिची नेटवर्थ अर्जुनपेक्षा कमी आहे, अशा तुलनेने अर्जुन कपूर दुखावला होता.

अर्जुनकडे एकूण 74 कोटींची संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी तो 5 ते 7 कोटी रूपये घेतो. मुंबईत त्याचं अलिशान घर आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने एक 23 कोटी रूपयांचा एक लक्झरी फ्लॅटही खरेदी केला आहे.

मलायकाचं म्हणाल तर ती 72-75 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ती एका आयटम नंबरसाठी 2 ते 3 कोटी घेते. अनेक शो ती जज करते, अनेक ब्रँडचं प्रमोशन करते, यातून मलायका बक्कळ कमाई करते.

दोघांकडेही लक्झरी गाड्या आहेत. अर्जुनने अलीकडे Mercedes Maybach व Land Rover Defender या लक्झरी कारची खरेदी केली. त्याच्याकडे Maserati Levante, Audi Q5 आणि Honda CR-V अशा गाड्या आधीच आहेत.

मलायकाकडे Range Rover LWB, Toyota Innova Crysta अशा गाड्या आहेत. मलायका वांद्रे येथील एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. त्याची किंमत सुमारे 10 कोटींच्या घरात आहेत.

अरबाज खानपासून वेगळं झाल्यानंतर मलायका अर्जुनला डेट करत आहे. मलायका वयाने अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. एका मुलाची आई आहे.

वयाच्या फरकामुळे त्यांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पण मलायका आणि अर्जुन हे दोघे एकमेंकासह खूप आंनदी असल्याचं दिसतं. 2019 मध्ये अर्जुनच्या वाढदिवसाच्यादिवशी त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.