HOTNESS ALERT: ‘टॉपलेस’ झाली ‘बाहुबली’ची अभिनेत्री, फोटो पाहून वाढेल हृदयाची धडधड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:11 PM2020-02-17T12:11:30+5:302020-02-17T12:18:28+5:30

बाहुबली- द बिगनिंग या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्कारलेट मेलिश विल्सन रिअल लाईफमध्ये कमालीची बोल्ड आहे. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते.

सध्या स्कारलेटचे टॉपलेस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

स्कारलेटने एकापाठोपाठ अनेक टॉपलेस फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.

स्कारलेट एक ब्रिटीश मॉडेल आहे. ‘बाहुबली’तील ‘मनोहरी’ या गाण्यात ती बेली डान्स करताना दिसली होती. अनेक तेलगू सिनेमातही तिने आयटम नंबर्स केले आहेत.

येवडू, चंडी, प्रेम अड्डा अशा साऊथच्या अनेक सिनेमात तिने काम केलेय. अलीकडे इमरान हाश्मीच्या ‘द बॉडी’ या सिनेमातील एका गाण्यात ती झळकली होती.

त्याआधी शंघाई व आर. राजकुमार या चित्रपटातील तिने आयटम सॉन्ग करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

डान्सर म्हणून तिची एक वेगळी ओळख आहे. तिच्या डान्सवर चाहते फिदा आहेत.

झलक दिखला जा आणि डेअर टू डान्स या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.

काही वर्षांपूर्वी सेटवर गैरवर्तन करणा-या आपल्या को-स्टारच्या स्कारलेटने थोबाडीत हाणली होती.

2008 मध्ये मिस्टर इंडिया राहिलेल्या प्रवेश राणासोबत तिने साखरपुडा केला होता. सुमारे 7 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले होते.