फरहान अख्तरची ‘लव्ह लेडी’ शिबानी दांडेकरच्या बोल्ड फोटोंनी लावली इंटरनेटवर आग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:10 PM2018-11-15T12:10:01+5:302018-11-15T12:23:15+5:30

आयपीएल होस्ट आणि बॉलिवूड गायिका शिबानी दांडेकर हिच्या हॉट-बोल्ड फोटोशूटची चर्चा कायम असते. तिचे फॅन्स तिच्या या बोल्ड लुकवर अक्षरश: फिदा असतात. शिबानीचे असेच काही हॉट आणि बोल्ड फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

बहुतेक फोटोंमध्ये शिबानीचे लुक खूपच बोल्ड आहे. बहुतेक फोटोंमध्ये शिबानीने ब्लॅक कलरचे आउटफिट्स वियर घातलेले आहेत. शिवाय तिची हेअरस्टाइलही खूपच सुंदर दिसत आहे.

इंटरनेटवर शिबानीचे फोटो मोठ्या प्रमाणात बघितले जातात. हेच कारण आहे की, शिबानी आपले फोटो शेअर करायला कधीही विसरत नाही.

गेल्या काही दिवसांपासून शिबानी व फरहान अख्तरच्या प्रेमाची चर्चा आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही आपले नाते जगापुढे मान्य केले आहे.

शिबानीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली आहे. शिवाय ती एक उत्कृष्ट गायिकाही आहे.

सोनाक्षी सिन्हा हिच्या आगामी ‘नूर’मध्ये शिबानी दिसली होती. अक्षय कुमार आणि तापसी पन्नू स्टारर ‘नाम शबाना;मध्ये शिबानी एका स्पेशल गाण्यावर डान्स करताना बघावयास मिळाली होती.