IN PICS : बॉलिवूडची कॉपी करण्यात मागे नाही हॉलिवूड, विश्वास बसत नसेल तर पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 05:15 PM2020-12-22T17:15:46+5:302020-12-22T17:38:34+5:30

बॉलिवूडचे बहुतांश सिनेमे साऊथ वा हॉलिवूडची कॉपी असतात, असा तक्रारीचा सूर नेहमीच ऐकायला मिळतो. यावरून बॉलिवूडची खिल्लीही उडवली जाते. पण हॉलिवूडनेही वेळोवेळी बॉलिवूड सिनेमांची कॉपी केली आहे. यावर एक नजर...

‘संगम’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. हॉलिवूडने या सिनेमाची कॉपी केली, हे सांगूनही तुम्हाला खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. 2001 साली प्रदर्शित ‘पर्ल हार्बर’ हा सिनेमा ‘संगम’वरून कॉपी करण्यात आला होता.

1993 मध्ये आलेल्या ‘डर’ या सुपरडुपर हिट सिनेमाचीही हॉलिवूडने कॉपी केली. शाहरूख खान, सनी देओल व जुहीच्या या सिनेमावरून 1996 साली ‘फिअर’ हा हॉलिवूड चित्रपट काढण्यात आला होता.

आयुष्यमान खुराणाचा ‘विकी डोनर’ हा सिनेमा भारतातच नाही तर विदेशातही गाजला. इतका की, विदेशींनी याची कॉपी केली. 2012 साली रिलीज विकी डोनर या सिनेमात स्पर्म डोनरची कथा आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर 2013 साली ‘डिलिवरी मॅन’ नावाने हॉलिवूड सिनेमा रिलीज झाला होता. तो ‘विकी डोनर’ची कॉपी आहे.

लीप इयर हा हॉलिवूड सिनेमा. या सिनेमाची कथा कोणत्या बॉलिवूड चित्रपटावर बेतलेली होती तर करिना-शाहिदच्या ‘जब वुई मेट’वर. हा सिनेमा 2007 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर 2010 साली ‘लीप इयर’ रिलीज झाला होता.

जस्ट गो विद इट या 2011 साली रिलीज हॉलिवूड सिनेमाची कथा 2005 साली रिलीज ‘मैनें प्यार क्यों किया’ या सलमान-सुश्मिताच्या सिनेमावरून कॉपी केली गेली होती.

‘अ कॉमन मॅन’ हा हॉलिवूडचा चित्रपट ‘अ वेन्सडे’ या बॉलिवूड चित्रपटावरून कॉपी करण्यात आला आहे. ‘अ वेन्सडे’ हा बॉलिवूड सिनेमा 2008 साली रिलीज झाला होता. त्याची कॉपी असलेला ‘अ कॉमन मॅन’ हा सिनेमा 2013 साली रिलीज झाला होता.

1995 साली रिलीज ‘रंगीला’ हा आमिर खान, जॅकी श्रॉफ व उर्मिला मातोंडकरचा सिनेमा खूप गाजला. यावर बेतलेला ‘विन ए डेट विथ टॅड हॅमिल्टन’ हा चित्रपट 2004 साली रिलीज झाला होता.

‘हिच’ हा चित्रपट 1976 साली रिलीज झालेल्या ‘छोटीसी बात’ या चित्रपटावरून कॉपी करण्यात आला होता. छोटीसी बात या सिनेमात अमोल पालेकर, विद्या सिन्हा व अशोक कुमार सारखे कलाकार होते.

‘द रिकार्नेशन ऑफ पिटर प्राऊड’ हा चित्रपट ‘मधूमती’ या चित्रपटावरून कॉपी करण्यात आला होता.

तसेच ‘फोर्टी शेड्स ऑफ ब्लू’ हा हॉलिवूड सिनेमा 1964 साली आलेल्या सत्यजीत रे यांच्या ‘चारूलता’ या सिनेमाची कॉपी होता. हा सिनेमा लव्ह ट्रँगलवर आधारित होता.