अल्लू अर्जुन नव्हे 'हा' आहे साऊथमधील महागडा अभिनेता; एका चित्रपटासाठी घेतो १०० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 10:42 AM2022-01-25T10:42:04+5:302022-01-25T10:46:08+5:30

Tollywood star: सध्याच्या काळात बॉलिवूडसोबतच आता दाक्षिणात्य चित्रपटांचीही चर्चा रंगू लागली आहे.अलिकडेच अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' चित्रपट आला आणि सगळीकडे या साऊथ सिनेमाची चर्चा रंगली.

सध्याच्या काळात बॉलिवूडसोबतच आता दाक्षिणात्य चित्रपटांचीही चर्चा रंगू लागली आहे.अलिकडेच अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट आला आणि सगळीकडे या साऊथ सिनेमाची चर्चा रंगली. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनच्या मानधनाचीही चर्चा होऊ लागली आहे. म्हणूनच, साऊथमधील महागडे कलाकार कोणते ते पाहुयात.

अल्लू अर्जुन - दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. अलिकडेच त्याचा पुष्पा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुन साऊथमधील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

ज्युनिअर एनटीआर - दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे ज्युनिअर एनटीआर. अॅक्शन सीनसाठी खासकरुन ओळखला जाणारा हा अभिनेता एका चित्रपटासाठी ४५ कोटी रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. एकेकाळी ज्युनिअर एनटीआर एका चित्रपटासाठी २५ ते ३० कोटी रुपये मानधन घ्यायचा. पण, आता त्याच्या मानधनात वाढ झाली आहे.

रामचरण - सध्या रामचरण RRR या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्याने ४५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार, रामचरणने त्याच्या आगामी चित्रपटांसाठीचं मानधन वाढवलं आहे. त्याने त्याच्या नेक्स्ट प्रोजेक्टसाठी तब्बल १०० कोटी रुपये फी आकारल्याचं सांगण्यात येतं.

महेश बाबू - दाक्षिणात्य कलाविश्वातील महेश बाबू आज लाखो तरुणींच्या गळ्यातलं ताईत आहे. महेश बाबूने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, तो प्रत्येक चित्रपटासाठी २०- ३० कोटी रुपये चार्ज करतो.

प्रभास - बाहुबली या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रभास. तेलुगू कलाविश्वातील प्रभास एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये फी घेतो.

सूर्या - जय भीम या चित्रपटामुळे चर्चेत येणारा सूर्या सध्या साऊथप्रमाणेच बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. सूर्या एका चित्रपटासाठी २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतो.