हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसराची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 05:15 PM2020-03-13T17:15:04+5:302020-03-13T17:30:47+5:30

हरभजन सिंगला युवराज सिंगनेदेखील मदत केली होती.

क्रिकेटर हरभजन सिंग याची पत्नी गीता बसरा ऐकाकाळीची बॉलिवूडची अभिनेत्री आहे.

कमी वेळात गीताने गेल्या काही काळापासून बॉलिवूडपासून अंतर निर्माण केले आहे.

आज गीता तिचा 36वा वाढदिवस साजरा करते आहे. 2006 मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा 'दिल दिया है'मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

यानंतर 2007 मध्ये ती पुन्हा इमरानसोबत 'द ट्रेन'मध्ये झळकली होती.मात्र या सिनेमाला म्हणाव तसं यश मिळू शकलं नाही.

2015 मध्ये हरभजन आणि गीताने गेल्या वर्षी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते.

सुमारे पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. एका गुरुद्वारात त्यांनी लग्न केले होते.

लग्नानंतरही गीता सिनेमांमध्ये काम करत होती.

गीता आणि हरभजनला हिाना नावची गोंडस मुलगी आहे. गीता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

मुलगी हिनासोबतचे फोटो ती शेअर करत असते. गीताच्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवर नजर टाकली तर लक्षात येते की सध्या ती संसार खूपच खुश आहे.

हरभजनने गीताला वो अजनबी गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती. त्यानंतर एक मित्राच्या मदतीने त्यांने गीता नंबर शोधला.

गीताला मेसेज करत तिला कॉफी डेटवर बोलवले होते.

गीताने 3 ते 4 दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय दिला नव्हता.

भज्जी त्यावेळी साऊथ आफ्रिकेत होता आणि भारताने T-20 वर्ल्ड कप जिंकला होता.

ज्यावेळी हरभजन भारतात परतला तेव्हा गीताने त्यांचे अभिनंदन केले होते.

त्यानंतर गीताने हरभजनला मेसेज करुन आयपीएल मॅचची दोन तिकिटं मागितली होती.

हरभजनने तिला तिकिट्स दिली आणि आयपीएल दरम्यान दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.