रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:21 PM2021-09-28T12:21:59+5:302021-09-28T12:34:01+5:30

काही अभिनेत्रींची नावे वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...!

कधी काळी बॉलिवूडचा ‘प्ले बॉय’ अशी इमेज असलेला रणबीर कपूर याचा आज वाढदिवस. सध्या रणबीर आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले...

आलिया आयुष्यात येण्याआधी रणबीर कतरिना कैफच्या प्रेमात होता. अगदी तिच्यासोबत तो लिव्ह इनमध्येही राहिला. पण आईला कॅट पसंत नव्हती. तिच्या मर्जीखातर म्हणा वा अन्य कुठल्या कारणाने रणबीर हळूच कतरिनाच्या आयुष्यातून निघून गेला.

दीपिका आणि रणबीर कपूरच्या प्रेमाच्या चर्चा आजही होतात. ‘बचना ए हसीनो’ चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दीपिका तर रणबीरसाठी अक्षरश: वेडी होती. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपचा धक्का पचवणे दीपिकाला खूप जड गेले होते. ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

रणबीर कपूर कधी काळी अवंतिका मलिकसोबतही रिलेशनशिपमध्ये होता. अवंतिका आणि रणबीर एकत्र अभ्यास करायचे. अवंतिका ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकेत काम करत होती, तेव्हा रणबीर तिला भेटण्यासाठी मालिकेच्या सेटवर जायचा. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. पुढे अवंतिकाने अभिनेता इमरान खानसोबत लग्नगाठ बांधली.

रणबीर कपूर व सोनम कपूर यांनी एकाच चित्रपटातून डेब्यू केला. या सिनेमाचे नाव होते, ‘सावरियां’. या चित्रपटादरम्यान रणबीर आणि सोनम रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बºयाच बातम्या आल्या होत्या. अर्थात लवकरच दोघेही वेगळे झाले. ‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूर याबद्दल बोलली होती. दीपिकासाठी रणबीरने सोनमला धोका दिला असे म्हटले जाते.

अमीषा पटेल सोबत देखील रणबीरचे अफेअर असल्याच्या बातम्या एकेकाळी मीडियात गाजल्या होत्या. अमीषा कपूर कुटुंबीयांसोबत अनेक पार्ट्यांमध्ये देखील दिसली होती.

‘रॉकस्टार’ या सिनेमात रणबीर कपूर अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत दिसला होता. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढल्याची चर्चा होती. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.

फॅशन डिझाईनर नंदिता महतानीसोबतही रणबीरचे नाव जोडले गेले. ही नंदिता कोण तर करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूरची पहिली पत्नी. रणबीर व नंदिता यांच्या वयात 10 वर्षाचे अंतर होते, त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चेने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या नंदिताने नुकताच अभिनेता विद्युत जामवालसोबत साखरपुडा केला.

एका जाहिरातीच्या शूटच्या निमित्ताने श्रुती हासन व रणबीर कपूर एकत्र आले होते. यानंतर काही दिवस दोघांच्याही रिलेशनशिपची चर्चा होती. अर्थात श्रुतीने ही चर्चा फेटाळून लावली होती.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबतही रणबीरचे नाव जोडले गेले होते. दोघांचेही काही फोटो व्हायरल झाले होते. या व्हायरल फोटोनंतर दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

Read in English